सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात अनेकदा काही हास्यापद तर कधी धक्कादायक व्हिडिओजचा समावेश पाहायला मिळतो. यात कधी लोक जीवघेणे स्टंट करताना दिसून येतात तर कधी विचित्र गोष्टी करताना दिसून येतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करून जातात. यातील काही व्हिडिओ असे देखील असतात जे पाहून आपल्या आश्चर्याचा धक्काच बसतो.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयाण आहेत की पाहून तुमचेही डोकं चक्रवायला लागेल. कुत्रा हा असा प्राणी आहे ज्यावर काही लोक खूप प्रेम करतात तर काही लोक त्यांच्यापासून अंतर ठेवतात. जे लोक कुत्र्यांपासून दूर राहतात ते एकतर भीतीमुळे किंवा कुत्र्याने चावल्यामुळे असे करतात.आता तुम्ही अनेकदा कुत्र्याने माणसाला ऐकले असेल मात्र माणसानेच कुत्र्याला लावलेले कधी तुम्ही ऐकले आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क एका कुत्र्याचा चावा घेताना दिसून येत आहे. हे सर्व दृश्य पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – एकदमसे वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! तरुणीने केलं असं काही… Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कुत्र्याला पकडून दाताने चावत आहे. कुत्र्याचा आवाज ऐकून, त्याला खूप वेदना होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे यावेळी हा व्यक्ती अक्षरशः जमिनीवर लेटून कुत्र्याला पकडून जोरदार चावा घेताना दिसून येत आहे. यावेळी कुत्र्याची झालेली दयनीय अवस्था हृदय पिळवटून टाकते. यानंतर एक माणूस येऊन या व्यक्तीला असे करताना रोखतो आणि मग कुत्रा पळून जात स्वतःला जीव वाचवतो. ही घटना कुठली आहे आणि व्यक्तीने असे का केले असावे? याबाबत आद्यप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हेदेखील वाचा – धक्कादायक! बाल्कनी तुटताच दणादणा जमिनीवर आदळले लोकं, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
हा व्हायरल व्हिडिओ @bilal.ahm4d नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत . एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकजण त्याच्यावर रागावेल कारण तो कुत्रा चावत आहे, परंतु जेव्हा तो कुत्रा त्याला चावतो तेव्हा कोणी काही बोलत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोकांनी हे कसे रेकॉर्ड केले आणि काहीही केले नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सर्वात मूर्ख माणूस, बिचारा कुत्रा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.