पानीपनतचे तिसरे महायुद्ध...! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सध्या सोशल मीडियावर एक उत्तर मनोरंजनाचे साधण बनले आहे. रोज काही ना काही नवे पाहायला मिळते. कधी स्टंट, कधी जुगाड, तर कधी भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कोण कधी, कुठे कशावरुन भांडण करायला सुरुवात करेल याचा नेम नाही. कधी रेल्वेमध्ये तर कधी बसमध्ये तर कधी रस्त्याच्या मधोमध भांडण लोक करत असतात. भांडताना लोकांना आसपासच्या परिस्थितीचे भानही उरत नाही. सध्या सोशल मीडियावर दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला शेताच्या मधोमध भांडताना दिसत आहेत.
विचित्र बाब म्हणजे या महिला एकमेकांना मिठी मारुन भांडत आहे. दोघींचेही चेहरे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. तसेच कोणताही संवादही ऐकू येत नाही. या महिलांमध्ये वाद कशावरुन झाला हे देखील कळालेले नाही. दोन्ही महिला एकमेकांनी मारत आहेत, एकमेकींच्या झिंझ्या उपटत आहेत. तसेच एकमेकींना अक्षरश: मातीमध्ये लोळवण्यात आले आहे. तुम्ही पाहू शकता की, दोघीही महिला एकमेकींना हाणून-पाडून मारत आहे. खाली पडल्या तर उठत पुन्हा एकमेकींना मारायला सुरुवात करत आहेत.पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत एवढेच दृश्य दिसत आहे. हे सर्व दृश्य लांबून कॅमेरामध्ये कैद करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या हास्याचे कारण बनला आहे.
व्हायरल व्हिडिओ
पानीपत का तृतीय युद्ध अपने चरम पर है।
🤣 pic.twitter.com/xiFbGD1wQJ— Shanaya Khan (@Shanaya01786) August 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Shanaya01786 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसू आवरणे कठीण झाले आहे. अनेकांनी नक्कीच नवऱ्यामुळे भांडण झाले असणार यांच्यात असे म्हटले आहे, तर काहींनी दोन जावा-जावा भांडत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर गंभीर चर्चेचा विषय बनला आहे.
Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.