Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

झांबियातील असल्याचे सांगितले जाणाऱ्या एका व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर सिंहांचा मोठा कळप फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन बाईकस्वार कोणतीही भीती न बाळगता सिंहांच्या अगदी जवळून पुढे जातात.
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Two Bikers Ride Fearlessly Through a Pride of Lions at Night in Zambia Two Bikers Ride Fearlessly Through a Pride of Lions at Night in Zambia
Published on: 
Updated on: 
  • व्हिडिओमध्ये काय दाखवले आहे?

  • व्हिडिओवरील प्रतिक्रियाही व्हायरल

  • जंगलाजवळ बाईक चालवणे खूप धोकादायक

Lions Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर सिंहांचा एक कळप चालताना दिसतोय. असे असूनही, बाईकवरून जाणारे दोन जण न थांबता पुढे निघून जातात. व्हिडिओ समोर येताच लोकांनी त्यावर उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या. अनेक जण बाईकस्वारांच्या धैर्याचे कौतुक करत आहेत, तर काही जण सिंहांच्या शांततेमुळे आश्चर्यचकित झालेत.

व्हिडिओमध्ये काय दाखवले आहे?

या व्हायरल व्हिडिओ मध्ये रात्रीच्या वेळी एका सुमसाम रस्त्याचा आहे.हा व्हिडिओ बाईकच्या मागे जाणाऱ्या एका गाडीतन शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, दोन व्यक्ती बाईक चालवत आहेत, त्यापैकी एकाने नारंगी रंगाचा शर्ट घातला आहे. बाईक पुढे जाऊ लागताच, रस्त्याच्या कडेला आणि मधोमध सिंह दिसतात. एक-दोन नव्हे, तर अनेक सिंह रस्त्यावर फिरताना दिसतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बाईकस्वार थांबतही नाही किंवा वेग कमीही करत नाही. तो फक्त सिंहांजवळून पुढे निघून जातो. बाईक पाहून सिंह हल्ला करत नाहीत, उलट ते शांतपणे रस्त्यावरून चालत राहतात.

हा व्हिडिओ झांबियामधील असल्याचे म्हटले जाते. हा व्हिडिओ safarinest आणि @wildfreelions सारख्या इनस्टाग्राम अकाऊंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे सिंह रस्त्यावर फिरत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की हा परिसर जंगलाजवळचा आहे, जिथे सिंह सामान्यपणे आढळतात.

व्हिडिओवरील प्रतिक्रियाही व्हायरल

या व्हिडिओवरील प्रतिक्रियाही व्हायरल होत आहेत. अनेक युझर्सनी गंमतीने कमेंट केली की, हे लोक कोण आहेत, जे न घाबरता इथून चालत गेले, असा विचार सिंह करत असतील. इतर युझर्सनी लिहिले की, सिंह पोटभर जेवलेले दिसत होते, त्यामुळे त्यांनी हल्ला केला नाही. काहींनी या व्हिडिओची तुलना गुजरातमधील गीरशी केली, जिथे सिंह आणि माणसे एकाच परिसरात राहतात. काही युझर्सनी लिहिले की, हे रोजचेच आहे आणि आफ्रिकेत असे घडते. काहींनी बाईकस्वारांना असे न करण्याचा सल्लाही दिला, कारण ते खूप धोकादायक असू शकते.

जंगलाजवळ बाईक चालवणे खूप धोकादायकयक

तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी जंगलाजवळ बाईक चालवणे खूप धोकादायक असू शकते. या व्हिडिओमध्ये सिंह शांत दिसत असले तरी, वन्य प्राण्यांचे वर्तन कधीही बदलू शकते. त्यामुळे, अशा परिस्थितीत थांबणे आणि सुरक्षित अंतर राखणे उत्तम.