Trump Modi Call: ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी फोनवर साधला संवाद; होर्मुझ आणि पश्चिम आशियावर चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump Modi Call 40 minutes highlights : जागतिक तणावाच्या वातावरणात एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यात मंगळवारी सुमारे ४० मिनिटे प्रदीर्घ दूरध्वनी संवाद झाला. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धानंतरचा हा या दोन महाशक्तींच्या नेत्यांमधील दुसरा संवाद आहे. या संवादाने केवळ भारत आणि अमेरिकेचे संबंध अधोरेखित केले नाहीत, तर पश्चिम आशियातील युद्धाला पूर्णविराम मिळण्याचे संकेतही दिले आहेत.
या संभाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. लास वेगासमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मोदी हे माझे सर्वात चांगले मित्र आहेत आणि ते भारतासाठी उत्कृष्ट काम करत आहेत.” अमेरिकेचे राजदूत सर्गेई गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संवादाच्या शेवटी ट्रम्प यांनी मोदींना “आम्हा सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे” असे भावनिक उद्गार काढले. यावरून जागतिक स्तरावर भारताचे आणि मोदींचे वाढलेले वजन स्पष्टपणे दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Uranium: जागतिक राजकारणात महास्फोट! इराणने अमेरिकेसमोर टेकले गुडघे? ट्रम्प यांच्या ‘युरेनियम’ सोपवण्याच्या वृत्ताने खळबळ
संवादाचा मुख्य केंद्रबिंदू हा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) होता. जगातील २०% तेल व्यापार याच मार्गावरून होतो. अलीकडेच एका चिनी टँकरने हा मार्ग ओलांडल्यामुळे तणाव वाढला होता. मात्र, मोदी आणि ट्रम्प यांनी हा सागरी मार्ग कोणत्याही अडथळ्याविना खुला आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची ग्वाही दिली आहे.
Trump Dials PM Modi, Discusses Bilateral Cooperation, Strait Of Hormuz https://t.co/8R6FmbGObO pic.twitter.com/uOt8rkCrC9 — NDTV WORLD (@NDTVWORLD) April 14, 2026
credit – social media and Twitter
सर्वात खळबळजनक बाब म्हणजे ट्रम्प यांनी केलेला दावा! इराण आपले संवर्धित युरेनियम अमेरिकेला देण्यास तयार झाला असून, दोन्ही देश एका ऐतिहासिक अणुकराराच्या अत्यंत जवळ आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले. जर हा करार यशस्वी झाला, तर पश्चिम आशियातील अण्वस्त्रांचा धोका कायमचा टळू शकतो. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या काळात पाकिस्तानची प्रशंसा केल्यामुळे या दाव्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
दुसरीकडे, युद्धाच्या खाईत लोटलेल्या पश्चिम आशियातून एक सुखद धक्का देणारी बातमी ट्रम्प यांनी दिली. तब्बल ३४ वर्षांनंतर इस्रायल आणि लेबनॉनचे नेते समोरासमोर भेटले असून त्यांच्यात युद्धविराम करारावर सहमती झाली आहे. दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत संपायला अवघे पाच दिवस उरले असताना झालेली ही घोषणा दुसऱ्या महायुद्धाची भीती घालवणारी ठरली आहे. मोदी-ट्रम्प यांच्या या संवादामुळे आता जगाला शांततेची नवी आशा लागली आहे.
Ans: प्रामुख्याने पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा, द्विपक्षीय व्यापार आणि इराणसोबतच्या संभाव्य अणुकरारावर दोन्ही नेत्यांनी ४० मिनिटे सविस्तर चर्चा केली.
Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इराण आपले संवर्धित युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करण्यास तयार झाला असून, दोन्ही देश अण्वस्त्रांशी संबंधित ऐतिहासिक कराराच्या उंबरठ्यावर आहेत.
Ans: अमेरिकेच्या मध्यस्थीने तब्बल ३४ वर्षांनंतर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये भेट झाली असून त्यांनी अधिकृतपणे युद्धविराम जाहीर केला आहे.






