चंदीगड: पंजाबात अरविंदे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दणदणीत यश मिळवले आहे. निवडणूक आयोग देत असलेल्या माहितीत आपने ६४ जागी आघाडी घेतल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ आप राज्यात बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे.
चंदीगड: पंजाबात अरविंदे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दणदणीत यश मिळवले आहे. निवडणूक आयोग देत असलेल्या माहितीत आपने ६४ जागी आघाडी घेतल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ आप राज्यात बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे. आपने जाहीर केलेले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. आपने दिल्लीनंतर पंजाबही काबीज केल्याने आपची राजकीय प्रतिष्ठाही आता वाढली आहे.
आपला ४२.९ टक्के मते
पंजाबमध्ये सत्तेत असलेली काँग्रेस, काँग्रेस सोडून बाहेर पडलेले अमरिंदर सिंग, स्थानिक प्रादेशिक पक्ष शिरोमणी आकाली दल, भाजपा इतके सगळे स्पर्ध असतानाही पंजाबी नागरिकांनी आपच्या पदरात भरभरुन मते टाकली आहे. ४२.९ टक्के मते आपच्या पदरात पडली आहेत. हा मोठा आकडा आहे. आपवर पंजाबी नागरिकांनी किती विश्वास टाकला हेच यातून स्पष्ट होते आहे.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू आणि स्वतंत्र पक्ष काढणारे कॅप्टन अमरिंदर सिंग हे पिछाडीवर आहेत.