फोटो सौजन्य: Pinterest
कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार फक्त 21 मिनिटांत चार्ज होऊ शकते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 800 किलोमीटरपर्यंत धावू शकते. इतकी मोठी रेंज असल्यामुळे वारंवार चार्जिंगची गरज कमी होते. विशेष म्हणजे, ही कार ‘व्हेईकल टू होम’ फीचरसोबत येते, ज्यामुळे गरज पडल्यास घरालाही वीज पुरवठा करता येतो.
नवीन BMW iX3 मध्ये व्हीलबेस 108 मिमीने वाढवण्यात आला असून तो आता 3005 मिमी झाला आहे. याशिवाय कारची एकूण लांबी सुमारे 4.9 मीटरपर्यंत वाढली आहे. यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते, विशेषतः मागील सीटवरील प्रवाशांसाठी लेगरूम वाढला आहे. त्यामुळे लांब प्रवास अधिक आरामदायी होतो आणि कुटुंबासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते.
या नव्या मॉडेलमध्ये BMW ने डिझाइनमध्ये काही बदल करताना सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. चीनमध्ये रिट्रॅक्टेबल डोअर हँडल्सवर निर्बंध असल्याने या कारमध्ये पारंपरिक बाहेर ओढता येणारे हँडल्स दिले आहेत. हा बदल लहान वाटला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतात येणाऱ्या मॉडेलमध्येही अशाच डिझाइनची शक्यता आहे. एकूणच कारचा लूक आधुनिक आणि प्रीमियम आहे.
VinFast भारतात आपली मुळे घट्ट करण्यासाठी सज्ज! नवीन E Scooter लाँच करण्याच्या तयारीत
BMW iX3 मध्ये अत्याधुनिक बॅटरी आणि सिस्टीम देण्यात आली आहे, जी जलद चार्जिंगसह उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. 21 मिनिटांत चार्ज होण्याची क्षमता ही या कारची मोठी जमेची बाजू आहे. ‘व्हेईकल टू होम’ फीचरमुळे ही कार केवळ प्रवासासाठीच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत घरासाठी वीजपुरवठा करण्यासाठीही उपयुक्त ठरते.






