
फोटो सौजन्य: Instagram
टीव्ही शो CID मधील दयाची भूमिका साकारणारे दयानंद चंद्रशेखर शेट्टी यांनी एक नवीन लक्झरी SUV खरेदी केली आहे. अभिनेत्याने लँड रोव्हर डिफेंडर 110 खरेदी केली आणि त्याच्या डिलिव्हरीचे फोटो त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. या खरेदीसह, दया लँड रोव्हर डिफेंडर असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाले आहे. त्यात मजबूत रोड प्रेझेन्स, लक्झरी आणि ऑफ-रोड क्षमता आहे, ज्यामुळे ही कार लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. डिफेंडरमध्ये कोणते खास फीचर्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
भारतात नव्या अपडेटसह Kawasaki Versys 650 झाली लाँच, किंमत देखील वाढली
CID च्या दयाने Borasco Grey रंगात Defender 110 खरेदी केली. यात ग्लॉस डार्क ग्रे कॉन्ट्रास्ट फिनिशसह 20-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स आहेत. हे अपग्रेड SUV ला अधिक प्रीमियम लूक देतात.
भारतात Land Rover Defender ला अनेक पॉवरट्रेन ऑप्शन्समध्ये ऑफर केले जाते. याच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते 296 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय 3.0-लीटर ट्विन-टर्बो इनलाइन-6 इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे, जे 296 hp पॉवर आणि 650 Nm टॉर्क देते.
अधिक परफॉर्मन्स पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी 4.4-लीटर ट्विन-टर्बो V8 इंजिन देण्यात आले आहे, जे 626 hp पॉवर आणि 750 Nm इतका दमदार टॉर्क निर्माण करते. तर टॉप-स्पेक व्हेरिएंटमध्ये 5.0-लीटर सुपरचार्ज्ड V8 इंजिन मिळते, जे 518 hp पॉवर आणि 625 Nm टॉर्क तयार करते.
रिव्हर्स प्रोजेक्ट अंतर्गत Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण
Defender च्या सर्व व्हेरिएंट्समध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि Land Rover चे प्रगत ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आले आहे.
Land Rover Defender 110 चे केबिन फंक्शनल असण्यासोबतच लक्झरीकडेही विशेष लक्ष देणारे आहे. यामध्ये 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जी Land Rover च्या Pivi Pro कनेक्टेड कार इंटरफेसवर चालते. याशिवाय 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळतो, ज्यामध्ये Pivi Pro कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या SUV मध्ये Meridian प्रीमियम साउंड सिस्टम, तसेच ClearSight रिअर-व्यू मिरर मिळतो, जो कॅमेरा फीडच्या मदतीने अधिक चांगली व्हिजिबिलिटी प्रदान करतो.
2025 च्या सुरुवातीला Land Rover ने भारतीय बाजारात Defender Octa लाँच केली. हे या SUV चे नवीन व्हर्जन असून, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.42 कोटी रुपये आहे. हा मॉडेल Defender 110 वर आधारित असून, हा हाय-परफॉर्मन्स व्हेरिएंट खास डिझाइन फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. अधिक ग्राउंड क्लिअरन्ससाठी यामध्ये वाढवलेली राइड हाइट, रुंद व्हील आर्च आणि मोठा स्टान्स देण्यात आला आहे, ज्यामुळे या SUV ची रोड प्रेझेन्स अधिक दमदार होते.