(फोटो सौजन्य-AI एआय)
प्रीमियम परफॉर्मन्स आणि क्रेझी डिझाइन
डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 मध्ये 1,158cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, 90-डिग्री V4 ग्रांटुरिस्मो इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 170 हॉर्सपॉवर आणि 91 lb-ft टॉर्क तयार करते. शहरातील कमी वेगापासून हायवेवरील वेगवान राइडपर्यंत पॉवर डिलिव्हरी कंट्रोलड ठेवण्यासाठी इंजिनला ट्यून करण्यात आले आहे.
होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
या बाइकला अॅल्युमिनियम मोनोकोक फ्रेम, मार्झोकी सस्पेंशन आणि ब्रेम्बो ब्रेक्स मिळतात. समोर 320mm ड्युअल डिस्क आणि मागे 280mm डिस्क देण्यात आली आहे. 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर ट्यूबलेस टायर्समुळे रस्ता आणि खराब रस्त्यांवर बाइकला चांगली पकड मिळण्यास मदत होते.
लॉंग रूटसाठीही आरामदायी
मल्टिस्ट्राडा V4 मध्ये 33.1 ते 33.9 इंचांपर्यंत अॅडजस्ट करता येणारी सीट, उंच विंडस्क्रीन आणि सरळ राइडिंग पोझिशन देण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात रायडरला आराम मिळण्यावर भर देण्यात आला आहे. सस्पेंशनमध्येही ऑटोमॅटिक फास्ट-लोअरिंग सुविधा उपलब्ध आहे.
ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
टेक्नॉलॉजीमध्येही पुढे
या ADV मध्ये राइडिंग मोड्स, पॉवर मोड्स, कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, कॉर्नरिंग लाइट्स आणि व्हेईकल होल्ड कंट्रोलसारखी फीचर्स आहेत. 5-इंच TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्विकशिफ्टर आणि क्रूझ कंट्रोलही मिळते.
डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 ची सुरुवातीची किंमत $19,995 आहे. जास्त प्रीमियम V4 S व्हेरिएंटची किंमत $29,995 असून त्यात इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन, रडार-असिस्टेड अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन आणि 6.5-इंच TFT डिस्प्ले यांसारखी जास्त फीचर्स मिळतात.






