(फोटो सौजन्य-AI एआय)
रॉयल एनफिल्डच्या बाइक्सची आघाडी
या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचा दबदबा कायम आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 1,10,259 मोटरसायकलींची विक्री केली. तिचा सेगमेंटमधील वाटा तब्बल 83.56% राहिला. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही 43,428 युनिट्ससह सर्वाधिक विकली जाणारी बाइक ठरली. तिच्या विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 20.55% वाढ झाली.
बुलेट 350 ची 27,533 युनिट्सची विक्री झाली, तर हंटर 350 ने 23,869 युनिट्सची नोंद केली. मेटिओर 350 ची विक्री 10,669 युनिट्स राहिली. हिमालयनने 3,068 आणि गुरिल्लाने 1,692 युनिट्सची विक्री केली.
होंडा आणि इतर कंपन्यांची कामगिरी
होंडा CB350 ने 9,052 युनिट्सची विक्री करत तब्बल 132.52% वार्षिक वाढ नोंदवली. याशिवाय नव्या होंडा CB500 ची डीलर डिस्पॅचला सुरुवात झाली असून ऑगस्टमध्ये 31 युनिट्स नोंदवण्यात आली.
ट्रायम्फच्या 350cc आणि 400cc मॉडेल्सची एकत्रित विक्री 4,839 युनिट्स झाली. केटीएम 350 आणि 390 यांनी मिळून 3,066 युनिट्सची नोंद केली. बजाज पल्सर 350/400 ची विक्री 1,712, तर डोमिनार 350/400 ची 1,353 युनिट्स राहिली.
Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये
हार्ले-डेव्हिडसन X440 ची विक्री 1,223 युनिट्स झाली. एप्रिलियाच्या RS 457 आणि Tuono 457 यांनी अनुक्रमे 297 आणि 74 युनिट्सची नोंद केली. एकूण आकडे पाहता, मोठ्या क्षमतेच्या बाइक्सकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे या विक्रीतून दिसते.






