

Ducati ने भारतात नवीन DesertX V2 अॅडव्हेंचर बाईक लाँच केली आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत १९.९९ लाख रुपये आहे
बाईकमध्ये ८९० सीसी क्षमतेचे नवीन V2 ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे
डुकाटीने भारतात आपली दुसऱ्या पिढीची डेझर्टएक्स V2 ॲडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. हिची किंमत १९.९९ लाख आहे. कंपनीच्या सर्व डीलरशिपवर बुकिंग सुरू झाले असून, डिलिव्हरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ही बाईक डुकाटीच्या पॅनिगाले V2 आणि मॉन्स्टर V2 सारख्या इतर V2 मॉडेल्सच्या श्रेणीत सामील झाली आहे.
नवीन डुकाटी डेझर्टएक्स V2 मध्ये नवीन 890cc V2 ट्विन-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 110 hp आणि 7,000 rpm वर 92 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक तिच्या कमाल टॉर्कपैकी सुमारे 70% टॉर्क 3,000 rpm इतक्या कमी वेगातच निर्माण करते. डुकाटीच्या मते, हे त्यांचे आजपर्यंतचे सर्वात हलके ट्विन-सिलेंडर इंजिन आहे, ज्यामध्ये प्रत्येक सिलेंडरमध्ये चार व्हॉल्व्ह आहेत.
यात IVT (व्हेरिएबल इनटेक व्हॉल्व्ह टाइमिंग) तंत्रज्ञान आहे. कंपनीचा दाव्यानुसार हे तंत्रज्ञान त्याच्या सेगमेंटमध्ये अद्वितीय आहे. गिअरबॉक्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिले चार गिअर लहान आहेत, ज्यामुळे खडबडीत ऑफ-रोड भूभागावर गाडी चालवणे सोपे होते. सहावा गिअर मोठा आहे, ज्यामुळे हायवेवर आरामदायी प्रवास करता येतो.
डेझर्टएक्स V2 मध्ये ॲल्युमिनियमची मोनोकॉक फ्रेम आहे, जी एअरबॉक्सचेही काम करते. इंजिनदेखील फ्रेममध्येच एकात्मिक केलेले आहे. मागील बाजूस ट्रेलिस सबफ्रेम आणि दुहेरी बाजू असलेला ॲल्युमिनियम स्विंगआर्म आहे.
सस्पेंशनची जबाबदारी KYB ने सांभाळली आहे. पुढच्या बाजूला २३० मिमी ट्रॅव्हल असलेला ४६ मिमीचा पूर्णपणे ॲडजस्टेबल अपसाइड-डाउन फोर्क आहे. मागच्या बाजूला रिमोट प्रीलोड ॲडजस्टमेंटसह २२० मिमी ट्रॅव्हल असलेला मोनोशॉक आहे. या बाईकमध्ये पुढच्या बाजूला २१-इंच आणि मागच्या बाजूला १८-इंच ट्यूबलेस स्पोक व्हील्स असून, त्यावर पिरेली स्कॉर्पियन रॅली STR टायर्स बसवलेले आहेत.
या बाईकमध्ये ६-ॲक्सिस आयएमयू (IMU) आहे, जो कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. एंड्युरो आणि रॅली मोडमध्ये एबीएस पूर्णपणे बंदही करता येतो. यात डुकाटी क्विक शिफ्ट २.० सिस्टीमदेखील आहे.
रायडरला स्पोर्ट, टूरिंग, अर्बन, वेट, एंड्युरो आणि रॅलीसह सहा रायडिंग मोड्स मिळतात. याव्यतिरिक्त, EVO मध्ये ५-इंचाचा TFT डिस्प्ले, नवीन जॉयस्टिक कंट्रोल्स, पूर्ण LED हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल आणि ब्रेक लाइट ही वैशिष्ट्ये आहेत. तसेच, ही गाडी डुकाटीच्या मल्टीमीडिया सिस्टीम आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनने सुसज्ज आहे.