Honda Rebel 300 भारतामध्ये लाँच; Royal Enfield Meteor 350 ला थेट टक्कर!

होंडा मोटरसायकलने आपली बहुप्रतिक्षित क्रूझर बाईक Honda Rebel 300 भारतीय बाजारात लाँच करून रॉयल एनफिल्डला थेट आव्हान दिले आहे. इलेक्ट्रॉनिक E-Clutch तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या क्लासिक बॉबर बाईकमध्ये असे कोणते खास फीचर्स आहेत, जे रायडर्सचे लक्ष वेधून घेत आहेत?
Untitled design (21)
Published on: 
Updated on: 
  • होंडाने आपली क्लासिक बॉबर डिझाइन असणारी Rebel 300 क्रूझर बाईक २.२२ लाख रुपयांत लाँच केली.

  • या बाईकमध्ये रायडर्ससाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक E-Clutch आणि मॅन्युअल अशा दोन क्लच पर्यायांची निवड उपलब्ध आहे.

  • २८६ cc इंजिन, ड्युअल ABS आणि 'Honda RoadSync' कनेक्टिव्हिटीसह ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली नवीन क्रूझर बाईक Honda Rebel 300 भारतीय बाजारात २.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. कंपनीच्या BigWing डीलरशिपद्वारे विकली जाणारी ही बाईक तिच्या कमी उंचीच्या सीट, आकर्षक बॉबर डिझाइन आणि ऑल-ब्लॅक मेकॅनिकल लुकमुळे रायडर्सचे लक्ष वेधून घेते. ५,००० रुपयांच्या टोकन रक्कमेवर बुकिंग सुरू झाले असून या बाईकची डिलिव्हरी ऑक्टोबर २०२६ च्या मध्यापासून सुरू होईल.

किंमत आणि व्हेरियंटचे पर्याय

Honda Rebel 300 ही बाईक मॅन्युअल क्लच असलेल्या स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये २.२२ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले E-Clutch व्हेरियंट २.६२ लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) या किमतीत सादर करण्यात आले आहे.

दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाईकमध्ये २८६ cc चे लिक्विड-कुल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे ३० hp ची पॉवर आणि २७.५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन क्रूझर रायडर्ससाठी अत्यंत सुलभ आणि शक्तिशाली मानले जाते.

क्रांतिकारी E-Clutch तंत्रज्ञान

या बाईकच्या E-Clutch मॉडेलमध्ये होंडाचे इलेक्ट्रॉनिक क्लच सिस्टीम तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे बाईक सुरू करताना किंवा गिअर बदलताना क्लच दाबावा लागत नाही; मात्र रायडर इच्छेनुसार नेहमीप्रमाणे मॅन्युअल क्लचचा वापरही करू शकतो.

प्रीमियम फीचर्स आणि सुरक्षा

सुरक्षेसाठी यात दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनेल ABS देण्यात आले आहे. याशिवाय बाईकमध्ये एलईडी प्रोजेक्ट हेडलॅम्प, टीएफटी डिजिटल डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि 'Honda RoadSync' स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांसारखे अत्याधुनिक फीचर्स मिळतात.