महिंद्राची नवी BE 07 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षी होणार लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स आणि महत्त्वाची माहिती

महिंद्रा BE 07 इलेक्ट्रिक SUV जून 2027 पर्यंत भारतीय मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या फोटोंमुळे 7 सीटर मॉडेलची चर्चा सुरू झाली आहे. 708 किमीपर्यंत रेंज देणाऱ्या BE 6 प्रमाणेच या SUV मध्ये बॅटरीचे ऑप्शन मिळू शकतात. 3 डिस्प्ले, ग्लास रूफ आणि ADAS सारख्या फीचर्सचीही अपेक्षा आहे.
Mahindra BE 07 Electric SUV Expected in 2027
Mahindra BE 07 Electric SUV Expected in 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • महिंद्रा BE 07 इलेक्ट्रिक SUV जून 2027 पर्यंत भारतात येण्याची शक्यता.

  • टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या फोटोंमुळे 7 सीटर मॉडेलची चर्चा सुरू.

  • 708 किमीपर्यंत रेंज देणाऱ्या BE 6 सारखे बॅटरी ऑप्शन मिळण्याची अपेक्षा.

इंडियन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये महिंद्रा आणखी एक नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची Mahindra BE 07 ही इलेक्ट्रिक SUV जून 2027 पर्यंत भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या कारच्या टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या फोटोंमुळे आता तिच्या 7 सीटर व्हर्जनचीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे मोठ्या कुटुंबासाठी इलेक्ट्रिक SUV शोधणाऱ्या कस्टमर्सना एक नवीन ऑप्शन मिळू शकतो.

महिंद्राने ऑगस्ट 2022 मध्ये BE 07 चे कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. सुरुवातीला या कारचे प्रोडक्शन मॉडेल ऑक्टोबर 2026 मध्ये आणण्याचे नियोजन होते. पण नोव्हेंबरमध्ये समोर आलेल्या कंपनीच्या नवीन रोडमॅपनुसार, जून 2027 अखेरपर्यंत एक नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच होणार आहे. ही कार BE 07 असण्याची शक्यता आहे. महिंद्राच्या BE इलेक्ट्रिक ब्रँडमधील BE 6 नंतरचे हे दुसरे मॉडेल असेल.

Mahindra BE 07 Electric SUV Expected in 2027
Mahindra Bolero Bold  एडिशन लाँच! ब्रॉन्झ अलॉय व्हील्स आणि प्रीमियम इंटिरियरचा नवा अंदाज सादर

7 सीटर मॉडेलची शक्यता

या SUV च्या टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये मागच्या बाजूला तिसऱ्या सीट रोची शक्यता दिसून आली आहे. यापूर्वीच्या स्पाय फोटोंमध्ये 5 सीटर केबिनची झलक दिसली होती. त्यामुळे महिंद्रा या SUV मध्ये 5 आणि 7 सीटर असे दोन केबिन लेआउट देऊ शकते. सध्या कंपनीच्या XEV 9S मध्ये 3 रो सीटिंगची सुविधा आहे.

BE 07 कॉन्सेप्टची लांबी 4,565 मिमी, रुंदी 1,900 मिमी आणि उंची 1,660 मिमी होती. तिचा व्हीलबेस 2,775 मिमी होता. प्रोडक्शन मॉडेलमध्ये या मापांमध्ये बदल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डिझाइनच्या बाबतीत या SUV मध्ये उंच मागचा भाग, C आकाराचे टेललॅम्प, मोठे व्हील आर्च आणि रूफ स्पॉयलर पाहायला मिळू शकतात.

Mahindra BE 07 Electric SUV Expected in 2027
Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स

708 किमीपर्यंत रेंजची शक्यता

महिंद्रा BE 07 मध्ये BE 6 प्रमाणे INGLO प्लॅटफॉर्मचा वापर होऊ शकतो. BE 6 मध्ये 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh असे 3 बॅटरी पॅक आहेत. यातील मोठ्या बॅटरीसह 708 किमीपर्यंत MIDC प्रमाणित रेंज मिळते. इलेक्ट्रिक मोटर 286 PS पॉवर आणि 380 Nm टॉर्क देते. BE 07 चे वजन आणि एरोडायनॅमिक डिझाइन वेगळे असल्यामुळे तिची रेंज बदलू शकते.

केबिनमध्ये 3 डिस्प्ले, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, डॅशकॅम, मल्टीकलर अॅम्बियंट लाइटिंग आणि लेव्हल 2 ADAS मिळण्याची शक्यता आहे. INGLO प्लॅटफॉर्ममध्ये 175 kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग आणि रिअर व्हील ड्राइव्ह तसेच ऑल व्हील ड्राइव्हची सुविधा देण्याची क्षमता आहे. मात्र, BE 07 मध्ये कोणते बॅटरी पॅक आणि ड्राइव्ह कॉन्फिगरेशन मिळेल, याची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.