Mahindra Electric Commercial Vehicles Price Hike (फोटो सौजन्य-AI एआय)
Mahindra LMM Price Hike संदर्भात महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने जानेवारी 2027 पासून आपल्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली दुहेरी आकड्यांतील वाढ आणि अचानक वाढलेली मागणी यामुळे कंपनीवर खर्चाचा दबाव आहे. याआधी कंपनीने 2 वेळा दरवाढ केली असून, त्यामुळे वाहनांच्या किरकोळ किमती एकूण 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळीही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल. वारंवार किमती वाढवणे आणि नंतर सवलती देणे, अशी पद्धत कंपनीला टाळायची आहे. महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टरचे प्रमुख राजेश जेजुरिकर यांनी आखलेल्या धोरणानुसार, छोट्या प्रमाणात पण कायमस्वरूपी दरवाढ करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे कमर्शियल वाहन वापरणाऱ्या कस्टमर्सना अचानक मोठा आर्थिक फटका बसणार नाही, असा कंपनीचा प्रयत्न आहे.
महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण
दरम्यान, इराणमधील संघर्षामुळे फ्युलच्या किमतींमध्ये चढ-उतार झाले. परिणामी ट्रेडीशनल फ्युल वर चालणाऱ्या प्रवासी 3-चाकी वाहनांचा खर्च वाढला आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वेगाने वाढला. भारतात प्रवासी 3-चाकी वाहनांमधील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा अवघ्या 4 महिन्यांत सुमारे 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे कंपनीने नमूद केले. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे महिंद्राच्या असेंब्ली प्रोडक्शनवर ताण आला आहे. त्यामुळे कंपनी आता पूर्ण इलेक्ट्रिक सेगमेंटच्या गरजा लक्षात घेऊन नवीन प्लांट उभारण्याचे नियोजन करत आहे.
महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीला 2026 चा अर्थशॉट पुरस्कार ‘क्लीन अवर एअर’ विभागात मिळाला असून, त्यासोबत 1 मिलियन पौंडचे बक्षीस मिळाले आहे. या निधीपैकी सुमारे 70 टक्के रक्कम महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण आणि डीलरशिप सर्व्हिस टेक्निशियन तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. बाकी 30 टक्के निधी मुंबईसारख्या शहरांमध्ये पब्लिक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी वापरण्याची योजना आहे.
महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर
कंपनी नेपाळ, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्ये निर्यात करते. आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातूनही नव्या चौकशा मिळत आहेत. दरम्यान, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी पुढील 12 ते 18 महिन्यांत IPO आणण्याच्या तयारीत आहे. पण त्याआधी प्रोडक्शन क्षमता वाढवणे आणि प्रॉफीटचे प्रमाण स्टेबल करणे कंपनीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
Ans: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी जानेवारी 2027 पासून आपल्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे.
Ans: कंपनीने याआधी 2 वेळा दरवाढ केली असून, या दोन्ही वाढींमुळे वाहनांच्या किरकोळ किमती एकूण 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Ans: कंपनी पुढील 12 ते 18 महिन्यांत IPO आणण्याच्या तयारीत आहे. पण त्यासाठी प्रोडक्शन क्षमता वाढवणे आणि उत्पादन खर्च व नफ्याचे प्रमाण स्थिर करणे आवश्यक ठरणार आहे.






