Matter Electric Bikes: गुजरातच्या 'Matter' कंपनीकडून ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्सची घोषणा; २४० कोटी रुपयांचा निधी उभारला

गुजरातच्या Matter या EV स्टार्ट-अप कंपनीने सुमारे २४० कोटी रुपयांचा नवा निधी उभारून भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असणाऱ्या आपल्या प्रसिद्ध Aera प्लॅटफॉर्मवर आधारित ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्स कंपनी लवकरच का लाँच करत आहे?
Untitled design (15)
(फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • गुजरातच्या Matter स्टार्ट-अपने २४० कोटींचा निधी उभारून तब्बल ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्याची आखली योजना.

  • १,००० कोटींचे एकूण भांडवल आणि १११ पेटंट्ससह कंपनी आपल्या उत्पादनाचा व सप्लाय चेनचा मोठा विस्तार करणार.

  • मॅन्युअल गिअरबॉक्स आणि १७२ किमी रेंज असणाऱ्या Aera प्लॅटफॉर्मवरच आधारित असणार या सर्व बाईक्स.

गुजरात (अहमदाबाद) येथील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्टार्ट-अप 'Matter' ने आपल्या नवीन ग्रोथ कॅपिटल राउंडमध्ये सुमारे २४० कोटी रुपये निधी उभारला आहे. या नवीन भांडवलाचा वापर कंपनी आपले उत्पादन, पुरवठा साखळी (सप्लाय चेन), विक्री नेटवर्कचा विस्तार आणि पुढील १२ ते २४ महिन्यांत ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्यासाठी करणार आहे.

Aera प्लॅटफॉर्मवर आधारित असणार नव्या बाईक्स

पुढील १ ते २ वर्षांत येणाऱ्या चारही नव्या इलेक्ट्रिक बाईक्स या 'Aera' प्लॅटफॉर्मवरच आधारित असतील. यामध्ये कंपनीचे इन-हाऊस पॉवरट्रेन, बॅटरी आणि सॉफ्टवेअर आर्किटेक्चर वापरले जाईल. सध्या बाजारात असलेल्या गाड्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा वापर करून या नव्या व्हेरियंट्सची रचना विविध रायडिंग सेगमेंटसाठी केली जाणार आहे.कंपनीचे स्वतःचे बॅटरी व पॉवरट्रेन उत्पादन असून, तब्बल १५० पेक्षा जास्त पुरवठादारांचे नेटवर्क कंपनीला पाठबळ देत आहे.

Matter Aera बाईकची खास वैशिष्ट्ये

  • पेटंट आणि तंत्रज्ञान: कंपनीकडे सध्या १११ मंजूर पेटंट आहेत.
  • गिअरबॉक्स: यात युनिक ४-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (गिअर सिस्टीम) मिळते.
  • बॅटरी आणि चार्जिंग: लिक्विड-कुल्ड बॅटरी पॅक आणि ऑन-बोर्ड चार्जिंग सिस्टीम दिली आहे, जी घरातील सामान्य ५-ॲम्पिअर सॉकेटनेही चार्ज होते.
  • रेंज आणि फीचर्स: ही बाईक १७२ किमी ची सर्टिफाइड रेंज देते. यात नेव्हिगेशन, म्युझिक आणि कॉल कनेक्टिव्हिटीसह ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.

नवीन निधी आणि भांडवल

या ताज्या फंडिंग राउंडसह Matter कंपनीने आतापर्यंत एकूण सुमारे १,००० कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. यापैकी ७५० कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीने आधीच संशोधन व विकास (R&D), उत्पादन आणि बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वापरली आहे. सध्या कंपनीच्या 'Aera' या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांची वेटिंग लिस्ट सतत वाढत आहे.