

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ची सुरुवातीची किंमत 4.89 लाख रुपये आहे.
743cc पॅरलल ट्विन इंजिन 63 Nm टॉर्क तयार करते.
देशभरातील बुकिंग 1 डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
Royal Enfield ने भारतीय दुचाकी मार्केटमध्ये आपली नवीन अॅडव्हेंचर टूरिंग बाईक Himalayan 750 लाँच केली आहे. कंपनीची ही पहिली 750cc इंजिन असलेली मोटरसायकल आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4,89,490 रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी 2026 मधील EICMA शोमध्ये या बाईकचे प्रदर्शन करण्यात आले होते. आता भारतीय रायडर्ससाठी तिची विक्री सुरू करण्याची तयारी कंपनीने केली आहे.
Himalayan 750 च्या सुरुवातीच्या बुकिंगची सुविधा 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी आयोजित मोटोव्हर्स कार्यक्रमात मिळणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबर 2026 पासून देशभरातील कस्टमर्सना कंपनीच्या वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपवरून बुकिंग करता येईल. लांब पल्ल्याचा प्रवास, डोंगराळ रस्ते आणि ऑफ-रोड रायडिंगचा अनुभव घेणाऱ्यांना लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे.
या मोटरसायकलमध्ये 743cc क्षमतेचे एअर आणि ऑइल कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5,000 RPM वर 63 Nm टॉर्क तयार करते. सस्पेन्शनसाठी पुढील बाजूला 43mm शोवा USD फोर्क्स असून त्यांचा ट्रॅव्हल 190mm आहे. मागच्या बाजूला शोवा मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. त्याचा व्हील ट्रॅव्हल 175mm आहे. बाईकमध्ये पुढे 19 इंच आणि मागे 17 इंच ट्यूबलेस टायर मिळतात. ब्रेकिंगसाठी ड्युअल फ्रंट डिस्क ब्रेक दिले आहेत. सीटची उंची 815mm, ग्राउंड क्लीयरन्स 205mm आणि फ्युल टँक 17 लिटरचा आहे.
फीचर्सच्या बाबतीतही हिमालयन 750 मध्ये अनेक सुविधा आहेत. यात 6-axis IMU, कॉर्नरिंग ABS, लीन सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि TPMS देण्यात आले आहे. रायडर्सना 5 रायडिंग मोड्स मिळतात. याशिवाय 60mm पर्यंत अॅडजस्ट करता येणारी 5-पोझिशन विंडस्क्रीन आणि नेव्हिगेशनसह 4 इंचांची गोलाकार TFT स्क्रीन दिली आहे.
किंमतीबाबत सांगायचे झाल्यास, अझ्टेक ग्रीन आणि टेक्टॉनिक ब्लॅक रंगातील कास्ट व्हील व्हेरिएंटची किंमत 4,89,490 रुपये आहे. वायकिंग ब्रॉन्झ आणि सायबेरिया व्हाइट रंगातील स्पोक व्हील व्हेरिएंटसाठी 5,14,495 रुपये मोजावे लागतील. तर अंटार्क्टिक सिल्व्हर टॉप व्हेरिएंटची किंमत 6,29,000 रुपये आहे. यात GIVI टॉप बॉक्स, पॅनियर्स, हीटेड ग्रिप्स, हँड गार्ड्स आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेट मिळते. सर्व किंमती चेन्नई एक्स-शोरूमनुसार आहेत.