
आपल्या आईबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी अमेरिकेत मागील शतकात अॅना जार्विस या सामाजिक क्षेत्रात काम करणऱ्या महिलेनी ८ मे हा दिवस स्वतः अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया येथील ग्रॅफ्टन येथील एपिस्कोपल चर्चमध्ये समारंभपूर्वक प्रथम साजरा केला आणि हे लोण पसरत गेले. आपल्या आईबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी असा दिवस साजरा करण्याची कल्पना प्रत्येकाला आवडली व त्यातूनच आंतरराष्ट्रीय मातृ दिन म्हणजे ‘मदर्स डे’ दरवर्षी ८ मे रोजी साजरा होऊ लागला. काही देशांमध्ये अन्य तारखांना हा दिवस साजरा केला जातो. यातूनच पुढे फादर्स डे, ग्रँड पॅरेन्ट्स डे यांचा जन्म झाला.
आपल्या देशात ८ मे हा दिवस आपण मदर्स डे म्हणून साजरा करतो. आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि ते योग्यच आहे. कोणती स्त्री ही लहान अथवा तरुण असताना स्वतःसाठी जीवन जगत असते. आई झाल्यावर मात्र बाळाच्या संगोपनाकडे आईचा कल असून त्यांना शिकवून मोठे करण्या कडेच तिचा भर राहतो. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ अशी म्हण आहे आणि ती योग्यच आहे.
प्रत्येकास आई असतेच या आईची स्त्री म्हणून अनेक रूपे असतात. पत्नी, बहिण, मावशी, मामी, काकी, आजी, पणजी या सर्व नात्यांमध्ये आई हे नाते अतिशय वातसल्य पूर्ण असते. ‘ स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ या म्हणीतच आईची महिती दिसून येते.
कोणती स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा ती व्यक्ती न राहता संस्था बनते. आपले मूळ आरोग्यदायी, सुसंस्कारी, सुशिक्षित व्हावे यासाठी ती सदैव झटत असते. आईची ही माया मुलगा अथवा मुलगी दोघांवर सारखीच असते. विवाहानंतर सासरी गेलेली मुलगी किती सुखी राहिली तरी तिचा मनात स्वतःच्या आईची ओढ खूप तीव्र राहिलेचे दिसून येथे. कारण ते अकृत्रिम नैसर्गिक प्रेम असते.
आज बदलत्या परिस्थितीनुसार मुली शिकताना मोठ्या प्रमाणात दिसतात. तसेच तरुण वयानंतर संसार सांभाळत नोकरी व व्यवसाय करताना दिसतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या त्या आईस आपले बाई अथवा लहान मूल चांगल्या प्रकारे सांभाळण्यसाठी पाळणाघरात ठेवावे लागते, तेव्हा तिचे मन आक्रंदीत होत असते. तिचा जीवाचा तुकडा दूर ठेवल्याचे दुःख आईला यामुळे होत असते.
समाजात प्रत्येक कुटुंबात प्रत्येकाचा मनात आपले आईबद्दल अकृत्रिम प्रेम असते मात्र काही वेदना देणारी उदाहरणे ऐकली अथवा बघितली की मन व्यथित होते. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये जागा अपुरी असल्यामुळे वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. वास्तविक आजी आजोबा झालेल्या त्या दोघांनाही पैशे, सोने, हिरे, मोटारी काही नको असते, हवे असते ते फक्त नातवंडांबरोबर खेळणे! मात्र वृद्ध काळात आवश्यक असणारे हे भावनिक नाते त्यांचा पासून दूर जाते हिचे दुख आपण समजू देखील शकत नाही.
मध्यंतरी १ बातमी वाचनात आली की दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून मद्यपी मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. हे वृत्त वाचल्यावर कुठल्या सुसंस्कृत माणसाचे मन व्यथित होणार नाही. एका कुटुंबात वृद्ध आई दोन मुलांकडे प्रत्येकी सहा महिने राहायची. एकावेळी पहिल्या मुलाने ६ महिने पूर्ण झाल्यावर वृद्ध आईला उचलून दुसऱ्या मुलाच्या घराचा दारावर ठेवले त्यातून दोन्ही मुलांकडे भांडण होऊन अखेर पोलीस केस झाली. अशा वेळी त्या वृद्ध आईला किती यातना झाली असतील हे आपण विचारच करू शकत नाही.
यासाठीच आपल्याल्या जन्म देणारी आई ही आपल्या आयुष्याची ठेव आहे, असे सदैव मानले पाहिजे. सासू – सून संघर्षात अनेक वेळा वृद्ध सासू म्हणजे मुलाची आई अडगळ वाटू लागते हे एेकून मनाला त्रास होते. अशा वेळी आपण प्रत्येकानेच तो दुसऱ्याच्या घरातील प्रश्न आहे असे न मानता समजुन सांगितले पहिजे. तिचे औषध पाणी, आरोग्य आणि मानसिक स्वस्थ जपले पाहिजे. येथे हे प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे की प्रत्येकाला आई असते मात्र ती प्रत्येकाला आयुष्यात एकदाच मिळते. त्यासाठीच केवळ मदर्स डे चा दिवशी नव्हे तर आयुष्यभर आईची सेवा करा. तिच्या चरणांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्या. ‘स्त्री ही अनंतकाळची माता असते’ हे मानल्यामुळेच आपण आईला देवीचे स्वरूप दिले. भवानीमाता, अंबामाता, रेणुकामाता, दुर्गामाता, लक्ष्मी माता, सरस्वती माता, यमाई माता अशी सारी रूपे म्हणजे आपली आईच असते. आयुष्य भर आईचा सन्मान करायचा हा संस्कार आपल्या बरोबरच पुढील पिढ्यांमध्ये देखील हा रुजवावा हेच ‘मदर्स डे’चे फलित मानता येईल.
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई
तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई
आईचे आशीर्वाद मागून तिचे ऋण यादिवशी तरी नक्की व्यक्त करा !
– तन्मयी मेहेंदळे
tanmayee.mehendale61@Gmail.com