Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रेनबो नेशन’ मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अ‍ॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती

Annual India Roadshow: २०२४ मध्‍ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱ्या ७५,५४१ पर्यटकांमध्ये तब्बल ६३.६ टक्के पर्यटक मुंबईकर, भारतात दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ; कौटुंबिक, साहसी आणि लग्झरी विभागांतील

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 21, 2025 | 03:58 PM
‘रेनबो नेशन’ मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अ‍ॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

‘रेनबो नेशन’ मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अ‍ॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Annual India Roadshow Marathi News: अनेक शहरांमधून यशस्वीरित्या प्रवास करत, साउथ आफ्रिकन टूरिझमने आपल्या अॅन्युअल इंडिया रोडशोच्या २१व्या पर्वाची सांगता मुंबईत केली. मुंबई शहर हा या प्रवासाचा अंतिम टप्पा होता. साउथ आफ्रिकन टूरिझमच्या आशिया, ऑस्ट्रेलिया, मध्य-पूर्व भागांतील प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. ग्कोबानी मांकोतायवा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रोडशोने, व्यावसायिक संबंध अधिक खोलवर नेणे, ग्राहकांचे उत्क्रांत होत जाणारे प्राधान्यक्रम हाताळणे आणि वाढीच्या नवीन संधी खुल्या करणे, यांसाठी एका धोरणात्मक व्यासपीठाची भूमिका बजावली.

४० प्रदर्शकांनी विविध प्रकारच्या ऑफर्स सादर करण्‍यासह या रोड शोमध्ये मुंबईतील ५०० हून अधिक ट्रॅव्हल ट्रेड एजंट्सचा उत्साहपूर्ण सहभाग दिसण्‍यात आला, ज्यामध्ये तिन्ही शहरातील एकूण १३०० हून अधिक भारतीय टूर ऑपरेटर्स सहभागी झाले होते. ‘रेनबो नेशन’मध्ये पर्यटक दाखवत असलेला रस वाढत असल्याने हे सर्वांच्या पसंतीचे पर्यटन स्थळ ठरत असल्याचे या भरघोस प्रतिसादातून दिसून आले. त्याचप्रमाणे भारतातील प्रवास व्यापार समुदायातील मोलाचे सहयोग जोपासण्यासाठी रोडशो महत्त्वाचा असल्याचा प्रत्ययही यातून आला.

L & T Shares: बाजार बंद होण्यापूर्वीच एल अँड टी टेक्नॉलॉजीजची मोठी अपडेट, शेअर्समध्ये २% वाढ

रोडशोदरम्यान टिप्पणी करताना मांकोतायवा म्हणाले, “भारत ही दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनासाठी नेहमीच उच्च प्राधान्य दिली जाणारी बाजारपेठ आहे. कौटुंबिक सहली, साहसी मोहिमा आणि चैनीसाठी प्रवास करणारे अशा विभागांतून या पर्यटनाला मोठी मागणी आहे. कौटुंबिक सहलींचा विभाग तुलनेने स्थिर असून, ४० वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांमध्ये दक्षिण आफ्रिकेत फिरण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. त्याचवेळी लोकसंख्येतील तरुणवर्गातूनही आश्वासक संधी दिसत आहे, या लोकसंख्या विभागाच्या संभाव्यता खुल्या करण्यावर पुढील काळात बराच भर दिला जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “२०२४ मध्ये ७५,५४१ भारतीय पर्यटकांनी रेनबो नेशनला भेट दिली. त्यात तब्बल ६३.६ टक्के पर्यटक हे मुंबईहून आले होते. याचा अर्थ ‘आउटबाउंड मार्केटिंग’साठी या भागात मोठी संभाव्यता आहे. भारतीयांना खास जिव्हाळा असलेल्या बाबींपैकी दोन म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट आमच्या धोरणात्मक व्याप्तीच्या केंद्रस्थानी कायम आहेत. चित्रपट निर्मितीसाठी यजमानपद भूषवण्यापासून क्रिकेटच्या खोलवर रुजलेल्या प्रभावाचा उपयोग करून घेण्यापर्यंत सर्व काही आम्ही करत आहोत. याद्वारे अधिकाधिक भारतीय प्रवाशांना दक्षिण आफ्रिकेची जादू अनुभवण्याची प्रेरणा देणारे दृढ सांस्कृतिक दुवे तयार करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. हे संबंध अधिक खोलवर रुजवण्याप्रती आणि ‘रेनबो नेशन’ला भेट देण्यासाठी भारतातून अधिकाधिक पर्यटकांचे स्वागत करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”

मुंबईकर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांना भेट देताना सर्वांगीण अनुभव हवा असतो, ते अनेकदा व्यवसाय व चैनीसाठी केलेला प्रवास यांची सांगड घालतात, रिटेल थेरपीचा आनंद घेतात आणि निसर्गाच्या सान्निध्यातील साहसांमध्ये स्वत:ला गुंतवून टाकतात. दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनासाठी मुंबई ही महत्त्वपूर्ण स्रोत बाजारपेठांपैकी (सोर्स मार्केट्स) एक आहे. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासात २०२४ मध्ये दखलपात्र वाढ नोंदवली गेली. ४२.३ टक्के प्रवाशांनी कामासाठी केलेल्या दौऱ्यांना जोडून चैनीचे उपक्रमही केले. शिवाय, १८.५ टक्के प्रवाशांनी खास आकर्षणे आणि साहसी अनुभवांमध्ये रस दाखवला, यातून वैविध्यपूर्ण व समृद्ध करणाऱ्या प्रवास संधींना असलेली दमदार मागणी दिसून येते. प्रवाशांची ही उत्क्रांत होत असलेली रूपरेखा लक्षात घेऊन साउथ आफ्रिकन टूरिझम धोरणीपणे मुंबईच्या प्रवास व्यापार समुदायाशी संवाद साधून आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांना प्रमोट करत आहे आणि या स्थळाचे बाजारपेठेतील आकर्षण अधिक वाढवत आहे.

प्रवासाला शिस्त आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दक्षिण आफ्रिकेतील नवीन इलेक्ट्रॉनिक ट्रव्हल ऑथरायझेशन (ईटीए) प्रणाली आणि ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (टीटीओएस) भारतीय पर्यटकांसाठी व्हिसावरील प्रक्रिया लक्षणीयरित्या सुधारण्यासाठी सज्ज आहेत. दोन राष्ट्रांमध्ये थेट हवाई मार्ग प्रस्थापित करण्यासाठीही चर्चा प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात मोठी मदत होणे अपेक्षित आहे. यावर भर देत श्री. मांकोतायवा म्हणाले, “पर्यटनस्थळांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्यक्रमात सोयीस्कर प्रवास हा मुद्दा महत्त्वाचा असतो. भारतीय प्रवाशांसाठी कनेक्टिविटी सुधारण्याच्या तसेच प्रवेशाच्या आवश्यकता सुलभ करण्याच्या दृष्टीने आम्ही संबंधितांसोबत काम करत आहोत.”

दक्षिण आफ्रिका २०२५ मध्ये जी-२० अध्यक्षपद स्वीकारण्यास सज्ज असून, जागतिक प्रवास सहयोग जोपासण्यामध्ये तसेच शाश्वत वाढीला चालना देण्यामध्ये पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भविष्यकाळाचा विचार करता, शाश्वत व्यापार सहयोग, ग्राहक जागरूकता उपक्रम व नवोन्मेष्कारी मार्केटिंग यांमार्फत भारतातील आपले स्थान अधिक भक्कम करण्याप्रती पर्यटन मंडळ वचनबद्ध आहे.

साउथ आफ्रिकन टूरिझम विषयी: साउथ आफ्रिकन टूरिझम हा दक्षिण आफ्रिकी सरकारचा पर्यटनविषयक मार्केटिंग विभाग आहे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर चैनीच्या, कामानिमित्त तसेच सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या पर्यटनाची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणे हे या विभागाचे काम आहे.
एक सरकारी यंत्रणा म्हणून, समावेशक आर्थिक वाढ, शाश्वत रोजगारनिर्मिती आणि उद्योगक्षेत्राचे नव्याने वितरण व रूपांतरण यांसंदर्भातील, दक्षिण आफ्रिकी सरकारच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास हा विभाग कटिबद्ध आहे.

सेन्सेक्सने नोंदवली ६५० अंकांची वाढ, निफ्टीने ओलांडला २३,३५० चा टप्पा, शेअर बाजारात तेजीचे कारण काय?

Web Title: 636 percent of tourists in the rainbow nation are mumbaikars south african tourism revealed during the annual india roadshow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Business News
  • share market news

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.