संग्रहित फोटो
पुणे : ॲमेझॉन इनवर २ लाखांहून अधिक विक्रेते असलेल्या महाराष्ट्रात नवीन विक्रेत्यांच्या नोंदणीत वार्षिक ७५ टक्के मोठी वाढ पाहायला मिळत आहे, ज्यामधून सेवेचा अधिक प्रमाणात अवलंब केला जात असल्याचे दिसून येते. आता अमेझॉनने आपल्या झिरो-रेफरल शुल्क योजनेची व्याप्ती १० पटीने वाढवून २०२५ मधील १.२ कोटी उत्पादनांवरून आता १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांपर्यंत नेली आहे. यामुळे फॅशन, होम, किचन आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज यांसारख्या दैनंदिन श्रेणीतील विक्रेत्यांना मोठा फायदा होणार आहे.
१,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवरील शून्य रेफरल शुल्क आणि ३०० रूपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांच्या इझी शिप शुल्कात केलेली २० टक्के कपात यांमुळे आधीच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यामुळे विक्रेत्यांना एकूण शुल्कात ७० टक्क्यांपर्यंत बचत करण्यास मदत होत आहे, तसेच ते ही बचत नवीन उत्पादने, स्पर्धात्मक किमती आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी पुन्हा गुंतवू शकत आहेत. आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ करत अमेझॉनने २०३० पर्यंत भारतात ३५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना देखील जाहीर केली आहे. आतापर्यंत केलेल्या जवळपास ४० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आधारित ही नवी गुंतवणूक प्रामुख्याने एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यातीतील वाढ आणि रोजगार निर्मिती या तीन धोरणात्मक आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करेल, असं ॲमेझॉनकडून सांगितले आहे.
ॲमेझॉन इंडियाच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर विक्रम देशपांडे म्हणाले, ”शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेच्या अवघ्या दोन आठवड्यांत आम्हाला महाराष्ट्रभरातील विक्रेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई यांसारख्या शहरांमधील विक्रेत्यांनी आधीच त्यांच्या उत्पादनांची श्रेणी वाढवण्यास सुरुवात केली आहे, शुल्कातून होणारी बचत ते पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतवत आहेत. शुल्कामध्ये कपात करण्यासह आम्ही सुलभ नोंदणी प्रक्रिया, कमी खर्चिक संरचना आणि विक्रेत्यांना अधिक चांगले व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत करणारी साधने उपलब्ध करून देण्यावर, तसेच त्यांचा दीर्घकालीन आणि शाश्वत विकास साधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नवीन संधी शोधणाऱ्या एआय-आधारित माहितीपासून व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या डिमांड-जनरेशन उपक्रमांपर्यंत आम्ही महाराष्ट्रातील विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय अधिक स्थिर आणि स्पर्धात्मक बनवण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या फायद्यांविषयी सांगताना, हिलियम चे सह-संस्थापक व सीओओ आणि ॲमेझॉन .इन वरील विक्रेते सिद्धार्थ जैन म्हणाले, ”२०१७ मध्ये ॲमेझॉनवर आमची पहिली ऑर्डर मिळाल्यापासून आज महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या महसूलापर्यंत पोहोचण्यापर्यंत हिलियमच्या विकास प्रवासात या मार्केटप्लेसचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या हिमतीवर आणि भांडवलावर सुरू केलेले स्टार्टअप असल्याने आमच्यासाठी रोख रकमेची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे आणि १,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर झीरो रेफरल शुल्क आमच्यासाठी प्रेरक ठरत आहे. यामुळे आम्हाला आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन उत्पादने लाँच करण्यासाठी अधिक पुढाकाराने गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. ॲमेझॉन आमच्या या प्रगतीच्या प्रवासात नेहमी महत्त्वाचा सहयोगी आहे.”
ॲमेझॉन ऑनबोर्डिंगपासून व्यवसायाचा विस्तार करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुलभता आणून विक्रेत्यांना झालेल्या खर्चातील बचतीचे रूपांतर प्रगतीत करण्यास सक्षम करत आहे. विक्रेते ही बचत कमी आणि स्पर्धात्मक किमतीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात, ज्यामुळे ऑटोमेट प्राइसिंग सारखी साधने व डील्स, कूपन्स आणि ‘बाय २ गेट १’ सारख्या डिमांड-जनरेशन पर्यायांचा वापर करून मागणी वाढवणे आणि कन्व्हर्जन सुधारणे शक्य होते. तसेच, ही बचत सेलर असिस्टंट सारख्या साधनांद्वारे पुन्हा व्यवसायात गुंतवता येते. सेलर असिस्टंट हा ॲमेझॉनचा जेनएआय-आधारित को-पायलट आहे, जो किंमत, लिस्टिंग, जाहिराती, पूर्तता आणि नियमांचे पालन यांबाबत रिअल-टाइम मार्गदर्शन करतो. याव्यतिरिक्त, जलद कंटेंट निर्मितीसाठी एआय-आधारित लिस्टिंग टूल्स आणि ग्राहकांच्या वास्तविक पसंतीनुसार उच्च-क्षमता असलेली उत्पादने शोधण्यासाठी प्रॉडक्ट अपॉर्च्युनिटी एक्सप्लोरर उपलब्ध आहे. ॲमेझॉन ॲड्स हे अडॅप्टिव्ह कॅम्पेन्स आणि प्रीपेड वॉलेट्सपासून स्ट्रीमिंग टीव्ही आणि क्रिएटिव्ह ऑटोमेशनपर्यंत सोपी, एआय-आधारित आणि मापनीय जाहिरात सोल्यूशन्स प्रदान करते, ज्यामुळे सर्व आकारांचे व्यवसाय कार्यक्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांचा प्रभाव मोजू शकतात आणि आत्मविश्वासाने प्रगती करू शकतात.
सेलर युनिव्हर्सिटी, सेलर कनेक्ट आणि न्यू सेलर लर्निंग पाथ यांसारखे सुनियोजित उपक्रम विक्रेत्यांना निरंतर प्रशिक्षण देतात. तर, मेगा सिलेक्शन सेलर रिवॉर्ड्स प्रोग्राम सारखे उपक्रम विक्रेत्यांना स्थानिक बाजारपेठांतून बाहेर पडून संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय विस्तारण्यास मदत करतात.
तसेच, ॲमेझॉनने पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे संपूर्ण भारतातील ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरीचा अनुभव मिळत आहे. गेल्या काही वर्षांत, ॲमेझॉनने महाराष्ट्रात प्रबळ फुलफिलमेंट आणि डिलिव्हरी नेटवर्क निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. आज राज्यामध्ये ॲमेझॉनची ८ फुलफिलमेंट सेंटर्स आणि ६ सॉर्टेशन सेंटर्स कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, राज्यामध्ये जवळपास २२० ॲमेझॉनच्या मालकीची आणि पार्टनर डिलिव्हरी स्टेशन्स आहेत, जवळपास ३,५०० ‘आय हॅव स्पेस’ स्टोअर्सचे नेटवर्क पसरलेले आहे.
संपूर्ण भारतातून अमेझॉन .इन वर नवीन विक्रेते सामील होण्याच्या प्रमाणात वार्षिक ५० टक्के वाढ झाली आहे, तसेच, महाराष्ट्रातून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ॲमेझॉनच्या विक्रेता वर्गाचा विस्तार होत आहे. या सर्व उपक्रमांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांची श्रेणी सुधारण्यास, अधिक स्पर्धात्मक किमती देण्यास आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत अधिक कार्यक्षमतेने आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होत आहे.






