संजय कपूरच्या संपत्तीच्या वादात आईनंतर आता बहिणीची उडी, ३०००० कोटी रुपयांच्या वारसा हक्कावरून वाद (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या वारशावरून सुरू असलेला वाद काही संपत नाहीये. यापूर्वी, त्यांची आई राणी कपूर यांनी भागधारकांना एक पत्र लिहून सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज (सोना कॉमस्टार) च्या व्यवस्थापनावर त्यांच्या मुलाच्या अचानक मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचा वारसा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आता संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूर स्मिथ यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि एका मुलाखतीत कंपनीवर कुटुंबाला अनोळखी व्यक्तींसारखे वागवल्याचा आरोप केला आहे.
सुमारे ३०,००० कोटी रुपयांची कंपनी असलेल्या सोना कॉमस्टारचे प्रमुख संजय कपूर यांचे १२ जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झाले आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराचा झटका हे कारण असल्याचे म्हटले आहे. ते ५३ वर्षांचे होते. यानंतर, त्यांची आई राणी कपूर यांनी सोना कॉमस्टारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला शेअरहोल्डर्सना एक पत्र लिहिले, ज्यामुळे खळबळ उडाली होती.
मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर
यानंतर, कपूर कुटुंब आणि सोना कॉमस्टारमधील वाद इतका वाढला की कंपनीने संजय कपूर आणि मंधीरा कपूरची आई राणी कपूर यांना काम थांबवण्याची नोटीस बजावली. सोना कॉमस्टार कंपनीने स्पष्टपणे सांगितले की २०१९ पासून राणी कपूरची कंपनीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणतीही भूमिका नाही. राणी कपूरने असाही आरोप केला आहे की, कंपनीच्या बोर्डावर त्यांची सून प्रिया सचदेवा कपूर यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता.
आई राणी कपूरनंतर, आता दिवंगत संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूर स्मिथने तिच्या वडिलांनी स्थापन केलेली ऑटोमोटिव्ह कंपनी आता तिच्या ८० वर्षीय आईसह संपूर्ण कुटुंबाशी कशी वागणूक देत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने दावा केला की कुटुंबाला अनोळखी लोकांसारखे वागवले जात आहे. मंधीरा म्हणाली की तिच्या भावाच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच कुटुंबाकडून सर्व काही हिरावून घेण्यात आले.
आई राणी कपूर यांना बोर्डात स्थान देण्याची मागणी करताना मंधिरा कपूर स्मिथ यांनी पुढे दावा केला की सोना कॉमस्टारची स्थापना माझे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांच्यामुळे झाली आणि ती उभारण्यात माझी आई नेहमीच वडिलांसोबत संस्थापकाच्या भूमिकेत राहिली आहे. ज्यांनी दागिन्यांच्या व्यवसायापासून कंपनी सुरू केली आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात ती मोठी कंपनी बनवली. परंतु बहुसंख्य भागधारक असूनही, आता त्यांच्या आईला कंपनीपासून पूर्णपणे बाहेर ठेवले जात आहे. त्यांनी अशी मागणी केली आहे की, ‘माझी आई राणी कपूर यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना कंपनीच्या बोर्डात गैर-कार्यकारी जागाही देण्यात यावी.’
संजय कपूरच्या बहिणीने कंपनीवर टीका केली की, संजय कपूरच्या मृत्यूनंतर बोर्ड मीटिंगला उशीर करण्याची विनंती केल्याबद्दल कंपनीने तिच्या आईला जाहीरपणे माफी मागण्यास सांगितले. कंपनी व्यवस्थापनाने तिच्या भावनांची पर्वा केली नाही किंवा कंपनी स्थापन करताना माझ्या वडिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्याचा आदर केला नाही. तिने सांगितले की बोर्ड मीटिंगला उशीर करण्याची मागणी करणे वाजवी आहे, कारण ती अनोळखी नाही.
मोठा आरोप करताना मंधिरा पुढे म्हणाली की, हा मुद्दा फक्त पैशाचा किंवा व्यवसायाचा नाही. ज्यांनी ही कंपनी बांधली नाही त्यांना फक्त पैसा दिसेल, पण ज्यांनी ती बांधली आहे त्यांना त्याहूनही बरेच काही दिसेल. आपण ते वारसा म्हणून पाहतो, आपल्याला त्यात आपल्या वडिलांची स्वप्ने दिसतात.
‘या’ कंपनीचे शेअर्स असतील तर वेळीच सावध व्हा! 40 टक्के GST लागण्याची शक्यता