उद्यापासून देशातील सर्व बॅंकांची खाती बंद होणार; पहा... तुमचे तर बॅंक खाते नाही ना?
उद्यापासून म्हणजेच 2025 च्या पहिल्या दिवसापासून देशभरातील बॅंकांमधील तीन प्रकारची बॅंक खाती बंद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) बँकिंग प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. या बदलांबाबत आरबीआयकडून मोठी घोषणा कऱण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा देशातील कोट्यवधी खातेदारांवर मोठा परिणाम होणार आहे.
रिझर्व्ह बँकेचा हा नवा नियम देशभरातील सर्व बँकांच्या बॅंक खात्यांवर लागू होणार आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तीन प्रकारची खाती बंद केली जातील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँक खाते देखील यामध्ये समाविष्ट आहे की नाही? हे तुम्ही तात्काळ तपासले पाहिजे.
का घेतलाय आरबीआयने हा निर्णय?
फसवणूक प्रकरणे रोखण्यासाठी, बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि सायबर फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने प्रामुख्याने अशी बँक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात गेल्या 12 महिन्यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही. म्हणजेच गेल्या 12 महिन्यांपासून किंवा त्याहून अधिक काळ बंद असलेली खाती आरबीआयकडून बंद केली जाणार आहे.
दुकानाचे महिन्याचे भाडे 40 लाख रुपये; मुंबईतील ‘हा’ मॉल आहे सर्वाधिक महागडा!
निष्क्रिय खाते श्रेणीमध्ये टाकले जाणार
ज्या बँक खात्यांमध्ये गेल्या 12 महिन्यांपासून किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशा बॅंक खात्यांना निष्क्रिय श्रेणीमध्ये टाकण्यात येणार आहे. जर एखाद्या खातेदाराने त्याच्या खात्यात एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार केला नसेल, तर या प्रकरणात ते निष्क्रिय श्रेणीमध्ये टाकून बंद केले जाईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून ते नंतर सक्रिय करू शकतात. बॅंक खात्याला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
झिरो बॅंलन्स असलेले खाते
दीर्घकाळ शून्य शिल्लक रक्कम असलेली बॅंक खाती ही १ जानेवारीपासून बंद होणार आहेत. त्यांना कोणत्याही गैरवापरापासून संरक्षण मिळावे, यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. यासोबतच ग्राहकांना त्यांची खाती पुन्हा पुन्हा वापरण्यास प्रोत्साहित करणे, हा देखील या चरणाचा उद्देश असणार आहे. तुमच्याही खात्यात बराच काळ शून्य रक्कम शिल्लक असल्यास, ताबडतोब तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन आणि केवायसी करून घेणे आवश्यक असणार आहे.
डोअरमॅट खाते
हे असे खाते आहे ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. ही खाती सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य असते. आणि हॅक केली जातात. ज्याचा वापर नंतर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो.