20 व्या वर्षी बनला कोट्यवधींचा मालक, अल्पावधीत सर्व गमावले; घेतली पुन्हा फिनिक्स भरारी, प्रसिद्ध बिझनेसमनने सांगितली आपबीती
सध्याच्या घडीला अनेकजण चांगला पैसा कमावतात. मात्र, प्रत्येकालाच आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन करायला जमत नाही. आज आपण अशाच एका व्यक्तींची कहाणी पाहणार आहोत. ज्याने आपल्या २० व्या वर्षी कोट्यवधींची संपत्ती कमावली. मात्र, तो अल्पावधीतच गरिब झाला. विशेष म्हणजे त्याने इतकी गरिबी अनुभवली की त्याला नव्याने उभारी घेण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले. मात्र, पुन्हा या व्यक्तीने फिनिक्सची भरारी घेतली आहे. त्यांनी शुन्यातूनही पुन्हा आपले जग उभे करता येते, हे दाखवून दिले आहे.
काय म्हटलंय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये
शॉक टँक इंडियाचे या सुप्रसिद्ध टीव्ही सिरिअलचे जज आणि Shaadi.com या संकेतस्थळाचे संस्थापक अनुपम मित्तल असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपली आपबीती लिंकडीन या समाजमाध्यमावर शेअर केली आहे. ते सांगतात, वयाच्या 20 व्या वर्षी आपण करोडपती बनलो, पण अलपावधीतच सर्व काही गमावले. मात्र पुन्हा नव्याने सुरुवात केली.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
याबाबत बोलताना त्यांनी आपल्या जुन्या काळाची आठवण करुन देत म्हणाले आहे की, अमेरिकेतील जीवन स्वप्नासारखे वाटत होते. त्यावेळी मी फेरारीची ऑर्डर देखील दिली, पण ती येताच आपले सर्व आर्थिक वैभव लयाला गेले. डॉटकॉमचा फुगा फुटताच पैसेही गायब झाले. त्यानंतर मी प्रचंड कर्जात बुडालो. मात्र, त्यातूनही पुन्हा उभारी घेतली.
भुमिकेवर ठाम राहिल्याने पुन्हा फिनिक्स भरारी
अनुपम मित्तल आपल्या पोस्टमध्ये सांगतात, सर्व काही गमावल्यानंतर 2003 मध्ये आपण भारतात परतलो. त्यावेळी आपल्याकडे केवळ मिळवलेल्या संपत्तीच्या आणि गमावलेल्या वैभवाच्या आठवणी होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही आपण शादी.कॉमची सुरुवात केली. लोकांनी आपल्या संकल्पनेवर खूप टीका केली. आपल्या व्यावसायिक भावनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मात्र, मी कोणाचेही ऐकले नाही आणि सर्व धोके पत्करले. मला वाटल्याप्रमाणे आपली ही संकल्पना गेम चेंजर सिद्ध होईल आणि तसेच झाले. आणि आपल्याला सर्व आर्थिक वैभव हळूहळू परत मिळाले. त्यामुळे अनुपम मित्तल यांच्या या पोस्टवरून त्यांनी राखेतून पुन्हा फिनिक्स भरारी घेतल्याचे सिद्ध होत आहे.