Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती; वाचा… त्यांची यशोगाथा!

सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्राला नवा मार्ग दाखवण्याची क्षमता असते. आनंद माहूरकर हे या दुर्मिळ श्रेणीतील एक दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जातात. ज्यांनी आपल्या ध्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून काही क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 29, 2024 | 04:44 PM
मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती; वाचा... त्यांची यशोगाथा!

मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती; वाचा... त्यांची यशोगाथा!

Follow Us
Close
Follow Us:

फाइंडॅबिलीटी सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून माहूरकर यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रात ‘एन्टरप्राईज एआय’, आणि ‘बिझनेस प्रोसेस को – पायलट’ या उत्पादनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली कंपनी उभी केली आहे. हा प्रवास जिद्द, गहन अंतर्दृष्टी, सूक्ष्म दृष्टीकोन आणि भविष्य घडविण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित होऊन झाला आहे.

साधरणतेपलीकडील दृष्टी

माहूरकरांचा प्रवास डेटा आणि एआयच्या प्रचंड क्षमता लक्षात घेतल्याने सुरू झाला. तंत्रज्ञान आणि व्यवसायात दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या माहूरकरांनी लवकरच जाणून घेतले की उद्योग जगतात मोठ्या प्रमाणात डेटा निर्मिती होत आहे. परंतु या डेटाचा उपयोग करुन व्यवसायाचे मूल्य वाढवण्याची कुठलीही साधने त्यांच्याकडे नाहीत आणि आगामी काळात – एआयमुळे डेटा वापरून नवी कार्यक्षमता आणि सुधारक नाविन्यपूर्णता निर्माण होऊ शकते.

फाइंडॅबिलीटी सायन्सेसची स्थापना

२०१० मध्ये त्यांनी फाइंडॅबिलीटी सायन्सेसची स्थापना केली. जी एक डेटा तंत्रज्ञान कंपनी असून, अनेक व्यवसायांना मोठ्या डेटाच्या गुंतागुतीतून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुरुवातीच्या काळात माहुरकरांनी डेटा उपयुक्त आणि विचारार्ह बनु शकेल अशा उपाययोजना विकसित केल्या. परंतु एआयच्या प्रचंड क्षमतेचा, सामर्थ्याचा शोध लागल्यावर त्यांनी निर्णायक विचार अंमलात आणला. ज्यामुळे कंपनीची भविष्यातील दिशा निश्चित झाली तो म्हणजे ‘जनरेटिव्ह एआयचे एकत्रीकरण’.

हे देखील वाचा – ‘ही’ आहे देशातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला; वाचा… काय आहे तिचे रतन टाटांसोबतचे कनेक्‍शन?

२०१८ पर्यंत माहुरकरांची दूरदृष्टी फलद्रूप झाली. त्यांनी फाइंडॅबिलीटी सायन्सेसला एआय आधारित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेषत्वाने, जनरेटिव्ह एआय केंद्रित तंत्रज्ञानाच्या विश्वात नेले. या बदलामुळे कंपनी जागतिक एआय क्रांतीच्या अग्रस्थानी आली. जनरेटिव्ह एआयमुळे फाइंडॅबिलीटी सायन्सेस आता केवळ डेटा विश्लेषणच नव्हे तर नवे दृष्टीकोन आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता उपलब्ध करून देत आहे ज्यामुळे उद्योगांना स्पर्धात्मक फायदाही मिळत आहे.

जागतिक प्रभावाचा उदय

माहूरकरांच्या नेतृत्वात फाइंडॅबिलीटी सायन्सेस कंपनीने जलद गतीने आपले जागतिक अस्तित्व वृद्धिंगत केले. आयबीएम सारख्या तंत्रज्ञानातील दिग्गज कंपन्याशी धोरणात्मक भागीदारी करून आणि विविध उद्योगांना एआय उपाययोजना पुरवून कंपनीने आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे ख्याती मिळविली. बदलणाऱ्या बाजारातील मागण्या समजून घेत त्यानुसार स्वतः लाही बदलत ठेवणे आणि त्याचवेळी आपली मूलभूत दिशा न बदलणे हे माहूरकरांच्या यशाचे गमक आहे.

फाइंडॅबिलीटी सायन्सेसच्या यशामागे केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर माहुरकरांनी सहकार्य आणि सांस्कृतिक एकात्मतेवर दिलेला भर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कंपनीच्या एआय उपाययोजना विविध बाजारांच्या गरजांसाठी तयार करण्यात आल्या आणि कंपनीचे कामकाज उत्तर अमेरिका, आशिया आणि युरोपमध्ये पसरले आहे.

एआय क्षेत्रातील विचारवंत

माहुरकरांचा प्रभाव त्यांच्या कंपनी पलिकडे विस्तारला आहे. एआय क्षेत्रांतील विचारवंत म्हणून त्यांनी एआयचा नैतिक वापर, डेटा गोपनीयता आणि भविष्यातील कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या विचारांची औद्योगिक सहकाऱ्यांमध्ये व सरकारी आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मागणी असते. ज्यामुळे ते एआय समुदायातील आदरणीय व्यक्तिमत्व ठरले आहेत.

दूरदृष्टीने प्रेरित एआयचे भवितव्य

फाइंडॅबिलीटी सायन्सेस जनरेटिव्ह एआयच्या सामर्थ्याच्या मर्यादा पुढे नेत राहतील हे निश्चित असले तरी माहूरकर नाविन्याचा ध्यास कायम ठेवून काम करत आहेत. त्यांच्या मते एआय उद्योगांना क्रांतिकारक बनवेल. परंतु खरा परिणाम एआयचा वापर करून प्रत्यक्ष जगातील समस्या, अडचणी आपण कशा सोडवू यावर असेल.

आनंद माहुरकरांची कथा केवळ तांत्रिक नवपरिवर्तनाची नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व आणि आभाळाएवढी स्वप्ने पाहण्याच्या धाडसाची आहे. ध्येयवेड्या हिंमतवान माणसाची आहे. अगदी साध्या सुरुवातीपासून ते एक जागतिक एआय साम्राज्य स्थापन करणारे आनंद माहूरकर यांनी दर्शविले आहे की, योग्य दृष्टीकोन आणि नाविन्याचा सतत ध्यास घेऊन, पाठपुरावा करून काहीही शक्य आहे.

Web Title: Bhoomiputra of marathwada created a global ai empire read their success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 04:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.