रक्षाबंधनाची मोठी कमाई, वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे तिप्पट; तज्ञ म्हणतायेत खरेदी करा 'हा' शेअर
गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहे. अशातही काही शेअर्स हे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. त्यापैकीच एक म्हणजे ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर आहे. कंपनी अलीकडेच तोट्यातून नफ्यात आली आहे. अशातच सध्या झोमॅटोचा शेअर चांगलाच तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झोमॅटोने आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तगडी कमाई केली आहे. कंपनीचे गुंतवणूकदार देखील मागील वर्षभरात चांगलेच मालामाल झाले आहेत.
झोमॅटोच्या शेअरने घेतली 6 टक्क्यांची उसळी
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच, झोमॅटोच्या शेअरने 6 टक्क्यांनी उसळी घेत, तो सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. झोमॅटोच्या शेअरमध्ये झालेली वाढ पाहता, आता ब्रोकरेजने देखील 300 रुपयांचे नवीन लक्ष्य दिले आहे. सध्या शेअर बाजारात झोमॅटोचा शेअर 278 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज या शेअरने 5.8 टक्क्यांनी वाढ नोंदवत 280.90 रुपयांची पातळी गाठली आहे. शेअरच्या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपवरही परिणाम झाला असून, ते 2.33 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. एकीकडे शेअर बाजारात झोमॅटोचा तेजीत असताना तिकडे कंपनीच्या व्यवसायात देखील रक्षाबंधनाच्या दिवशी मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा – क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार; वाचा… नेमकं काय आहे कारण!
वर्षभरात १ लाखाचे झाले ३ लाख
मागील वर्षभरापासून झोमॅटोच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे या शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळत आहे. झोमॅटो शेअरने केवळ एका वर्षात जवळपास 200 टक्के इतका मोठा परतावा देत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. दरम्यान, 21 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 89.75 रुपये होती. जी आज (ता.१९) 280 रुपयांवर आली आहे. अर्थात एका वर्षात 202 टक्के परतावा दिला आहे. झोमॅटोचा शेअर अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक म्हणून समोर आला आहे.
तज्ञही देत आहेत या शेअरच्या खरेदीचा सल्ला
सोमवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी वाढ होण्यामागील कारणांमध्ये, स्थानिक बाजारात गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना आणि सर्व ब्रोकरेजच्या लक्ष्य किंमतीत वाढ हे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, विदेशी ब्रोकरेज हाऊस युबीएसने झोमॅटोचे बाय रेटिंग कायम ठेवत, या शेअरची लक्ष्य किंमत 260 वरून, नव्याने 320 रुपये इतकी निश्चित केली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)