24 व्या वर्षी व्यवसायात उतरली, आज आहे तब्बल 3000 कोटींची मालकिण; वाचा... यशोगाथा!
सध्याच्या घडीला तरुणांचा ओढा व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर तरुणांना व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच यशस्वी उद्योजक महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या वयाच्या २४ व्या वर्षीय व्यवसायाला सुरुवात केली. त्या आज वयाच्या ४३ व्या वर्षी तब्बल 3,000 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या यशासह त्या भारतातील देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक बनल्या आहे.
लहानपणापासूनच वाढल्या व्यावसायिक वातावरणात
देविता सराफ असे या महिला उद्योजकाचे नाव असून, त्या मुंबईच्या रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाचे व्यवसायात मोठे नाव आहे. त्यांचे वडील राजकुमार सराफ हे जेनिथ कॉम्प्युटर्सचे चेअरमन होते. जेनिथ कॉम्प्युटर्स ही संगणक निर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. व्यावसायिक वातावरणात वाढलेल्या देविताला लहानपणापासूनच व्यवसायातील गुंतागुंत समजून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या याच व्यावसायिक ज्ञानातून त्यांनी वू टेलिव्हिजन कंपनी स्थापन केली. त्यांच्या याच कंपनीच्या यशाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत…
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – ‘या’ बॅंकेला आरबीआयचा मोठा दणका, केलीये ‘ही’ कारवाई; …तुमचे तर खाते नाहीये ना!
अमेरिकेत घेतले शिक्षण
देविता सराफ यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथून शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या आपल्या वडिलांची कंपनी जेनिथ कॉम्प्युटर्समध्ये काम करू लागल्या. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्या मार्केटिंग डायरेक्टर बनल्या. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ऑनलाइन प्रोग्राम मॅनेजमेंट कोर्सही केला.
२४ व्या वर्षी वू टेलिव्हिजनची स्थापना
2006 मध्ये देविताने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी वू टेलिव्हिजनची स्थापना केली. त्यावेळी महागड्या टेलिव्हिजनची बाजारपेठ भारतात नवीन होती. देविताने हार मानली नाही. त्यांनी उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि चांगली सेवा यावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू वू टेलिव्हिजनला लोकांची पसंती मिळू लागली. जेव्हा कंपनीने 2012 मध्ये 84-इंचाचा टीव्ही लॉन्च केला. तेव्हा त्याला खूप यश मिळाले. या टीव्हीमध्ये अशी नवीन वैशिष्ट्ये होती की तो टीव्ही आणि संगणक दोन्हीप्रमाणे काम करू शकतो. यानंतर वू टेलिव्हिजन एक प्रीमियम ब्रँड बनला.
हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!
3,000 कोटी संपत्तीच्या मालकीण
देविता सराफ या केवळ एक व्यावसायिक महिलाच नाही. तर एक अतिशय टॅलेंटेट महिला देखील आहे. ती मेन्सा सोसायटीची सदस्य आहे. मेन्सा ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी उच्च आयक्यु सोसायटी देखील आहे. 2024 मध्ये, हुरुन अहवालाने देविता यांना 3,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिला उद्योजक म्हणून घोषित केले आहे.