...क्रिकेट खेळणे सोडले, बिझनेसमध्ये पाऊल ठेवले; आज आहे अब्जावधींची संपत्ती!
भारतीय क्रिकेट विश्वात अनेकांनी आपले नाव कमावले. काही क्रिकेटर्स ना लोकांनी अक्षरशः डोक्याला घेतले. तर काहींना मध्येच आपले क्रिकेट करिअर सोडून व्यवसायामध्ये उतरावे लागले. आज आपण अशाच एका क्रिकेटरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने रणजी क्रिकेटपासून सुरुवात करत, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवण्यापर्यंत प्रवास केला. विशेष म्हणजे या क्रिकेटरने एका मोठ्या उद्योगपती घराण्यामध्ये जन्म घेतला असल्याने, २०१९ मध्ये त्याने क्रिकेट विश्वाला रामराम ठोकत पूर्णवेळ उद्योग व्यवसायात झोकून दिले. आज हा क्रिकेटर अब्जाधीश उद्योगपती म्हणून समोर आला आहे.
काय आहे ‘या’ क्रिकेटरचे नाव?
आर्यमन बिर्ला असे या क्रिकेटरचे नाव असून, तो अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. क्रिकेटमध्ये आपले करिअर सुरु करणारा आर्यमन हा 2017-18 मध्ये मध्यप्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. याशिवाय तो राजस्थान रॉयल्स संघाकडून 2018 मध्ये आयपीएलमध्ये देखील खेळला आहे. 2019 मध्ये त्याने आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह आपल्या उद्योग-व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी क्रिकेटमधून कायमचा काढताय पाय घेतला. मात्र, आज तो एक प्रसिद्ध आणि सफल उद्योगपती म्हणून समोर आला आहे.
किती आहे आर्यमन बिर्ला यांची नेटवर्थ?
आर्यमन बिर्ला याचा जन्म 9 जुलै 1997 रोजी झाला आहे. 2023 त्याची आदित्य बिर्लाच्या फॅशन आणि रिटेलच्या संचालकांपैकी एक म्हणून नियुक्ती झाली. आर्यमन बिर्ला यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. बिर्ला समूह हा देशातील अग्रगण्य आणि जुन्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असून, आर्यमन बिर्ला यांची एकूण नेटवर्थ 8.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आर्यमनचे वडील कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित समूहांपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. त्यांनी आर्यमन बिर्ला समूहाला आघाडीवर नेऊन ठेवले आहे.
बिझनेस जगतातही निर्माण केली ओळख
आर्यमन विक्रम बिर्ला यांनी क्रिकेटव्यतिरिक्त बिझनेस जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्यमन विक्रम बिर्ला हा ग्रासिम इंडस्ट्रीज आणि आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या बोर्डात सामील झाले आहे. त्यांनी मुंबईत ‘जोलीज’ नावाचा खास क्लबही सुरू केला आहे. विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आर्यमन विक्रम बिर्ला यांना कुत्रे खूप आवडतात. त्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे ‘द पॉवरस्टार कंपनी’. पाळीव प्राण्यांसाठी हे एक खास स्टोअर सुरु केले आहे.