सौजन्य - Wikipedia
स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाला वाटते ते घर परवडणारे असले पाहिजेच तसेच ते दीर्घकालीन टिकणे गरजे आहे. भारतामध्ये सध्या परवडणाऱ्या घरांची निर्मिती वाढत असून लोक परवडणाऱ्या घरांच्याबाबतीत शाश्वत भविष्याचाही विचार करत आहेत. यामुळेच शाश्वत बांधकाम आणि राहण्याच्या पद्धतीवर आधारित एक नवा कल उदयास आला आहे आणि तो म्हणजे ग्रीन होम्स अर्थात हरित घर हा होय. या ग्रीन होम्स संकल्पनेबद्दल गौरव मोहता, सीएमओ – होमफर्स्ट फायनान्स यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
ग्रीन होम्समुळे बांधकाम पद्धतींमध्ये आलेला हा शाश्वत बदल किफायतशीरतेसह टिकाऊपणाशी कायमचे बंध जोडत चालला आहे. स्वयं-निर्मित घरांसाठी ग्रीन होम्स हा एक अग्रगण्य प्रयत्न ठरताना दिसतोय. परवडणाऱ्या गृहनिर्माण उद्योगाची वाढ कायम ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात ग्रीन होम्स एक हरित मार्ग प्रदान करत आहेत.
ग्रीन होम्स ही परवडणारी आणि उपलब्ध स्वरुपातील घरे आहेत, मुळात ही संकल्पना अथवा विचार मान्य करायला लोक अजुनही काहीसा वेळ घेताना दिसतात. आराम किंवा कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करता टिकाऊ, दीर्घकालीन ऊर्जा आणि वीजबिलाच्या बचतही याद्वारे होते. स्वयं-निर्मित ग्रीन होम्स हे 20 टक्के अधिक कार्यक्षम आहेत. कारण त्यांच्या बांधकाम खर्च कमी असून ऊर्जा, पाणी आणि मूर्त ऊर्जेची ते मोठ्या प्रमाणात बचत करतात. ग्रीन होम्स संकल्पनेला जागतिक स्तरावरील आघाडीच्या संस्थांद्वारे मान्यता मिळालेली आहे. ही बाब पर्यावरणासाठी अतिशय उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.
स्वयं-निर्मित ग्रीन होम्स बांधण्याच्या पद्धतीत फ्लाय ॲश आणि काँक्रीटच्या विटांच्या निर्मितीमध्ये पुनर्नवीनीकरण केलेले घटक वापरलेले असतात. तसेच त्यांच्या उत्पादनासाठी इंधन जाळण्याची आवश्यकता नसते. या विटा केवळ खर्चाच्या दृष्टीनेच नव्हे तर बांधकाम प्रक्रियेला गती देण्याबाबत देखील किफायतशीर आहे. त्यामुळे मजुरांवरील खर्च कमी होतो आणि प्रकल्पाचा एकूण कालावधीही कमी होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास, घराची गुणवत्ता आणि त्याच्या आयुष्यमानाबाबत कोणतीही तडजोड न करता हरित बांधकाम पध्दत तुमच्या बांधकामाचा एकूण खर्च कमी करते.
ग्रीन होम्समधील प्लंबिंगमध्ये झालेल्या छोट्या प्रगतीमुळे पाण्याच्या बचतीत मोठी झेप घेतली गेली आहे. या नवकल्पना सध्याच्या वापराच्या पद्धतींमध्ये कोणताही व्यत्यय न आणता पाण्याच्या वापराचे नियमन करण्यास संधी देतात. पाण्याच्या प्रवाहाला प्रतिबंध करताना धुकेयुक्त पाण्याचा (मिस्ट) प्रवाह तयार होतो आणि आणि त्यामुळे कमी पाणी वापरले जाऊन पाण्याचा दाबही टिकवला जातो. या छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्ययास लगाम लागला आहे आणि तुमच्या खिशातील पैसाही वाचला आहे.
सीलिंग फॅन, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एसी यांसारखी मूलभूत उपकरणे पंचतारांकित रेटींगची असल्यास ती वीज खूपच कमी प्रमाणात वापरतात. ही उपकरणे कमी ऊर्जा वापरतात आणि वाढीव कालावधीत वीजेच्या खर्चात बचत घडवून आणतात. ओव्हरहँग्स आणि पांढऱ्या रंगाच्या छतांसारखे बांधकाम उपाय उष्म्यापासून बचाव करत आरामदायीपणा वाढवतात. परिणामी उर्जेचा वापर कमी होतो.
गृहनिर्माण योजनांसाठी सरकारकडून हिरारीने केला जात असलेला प्रचार आणि पर्यावरणपूरक जीवनासाठीची वाढती जाणीव यामुळे ग्रीन होम्सरुपी जीवनशैली अंगिकारण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. दाखवत आहेत. ग्रीन होम्सची लोकप्रियता भविष्यात आणखी वाढेल कारण ही घरे परवडणारी आहेत.






