Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लेक्सीलोन्सतर्फे 2025 मध्ये महिला-प्रणीत एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी 100 कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्य

FlexiLoans: भारतातील एमएसएमई-केंद्रित एनबीएफसी, फ्लेक्सीलोन्स, महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमई सक्षमीकरणासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यासाठी वचनबद्ध होऊन महिला उद्योजकांना असलेला आपला पाठिंबा मजबूत करते

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 04, 2025 | 06:11 PM
फ्लेक्सीलोन्सतर्फे 2025 मध्ये महिला-प्रणीत एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी 100 कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्य (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

फ्लेक्सीलोन्सतर्फे 2025 मध्ये महिला-प्रणीत एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी 100 कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्य (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

FlexiLoans Marathi News: मॅककिन्सेच्या अलीकडील अहवालानुसार, भारतातील महिलांच्या मालकीच्या व्यवसायांमध्ये 2025 पर्यंत जीडीपीमध्ये 280 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे. तथापि, केवळ 10 टक्के महिला उद्योजकांना औपचारिक पतपुरवठा उपलब्ध असल्याने त्यांना पतपुरवठा करण्यात महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) मते, भारतात सध्या 8 मिलियनहून अधिक महिलांच्या मालकीच्या एमएसएमई आहेत. ही संख्या भारताच्या उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांच्या वाढत्या योगदानावर प्रकाश टाकते. हमी-मुक्त व्यवसाय कर्ज (कोलॅटेरल-फ्री बिझनेस लोन) सुलभ करून महिलांच्या नेतृत्वाखालील या व्यवसायांच्या वाढीला चालना देण्यासाठी फ्लेक्सीलोन्स सज्ज आहे.

कंपनीने मागील पाच वर्षांत वार्षिक महिला कर्जदारांमध्ये 2.3 पट लक्षणीय वाढ नोंदवली आहे, जी 2019 दरम्यान 1,300 वरून 2024 मध्ये 3,000 हून अधिक नोंदविण्यात आली. ही वाढ भारतभरातील महिलांमध्ये, विशेषतः टियर 2 आणि 3 शहरांमधील वाढत्या उद्योजकतेची भावना अधोरेखित करते. ज्या एकत्रितपणे फ्लेक्सीलोन्सच्या महिला कर्जदारांपैकी सुमारे 70 टक्के आहेत.

Tata Capital IPO: मोठी अपडेट, देशातील सर्वात मोठा IPO लाँच होण्यास सज्ज!

कर्ज देण्याच्या बाबतीत सकारात्मक ट्रेंड

विशेष म्हणजे, महिला उद्योजकांनी मागितलेली सरासरी कर्जाची रक्कम 81% ने वाढली आहे. 2019 मध्ये नमूद मागणीनुसार ही रक्कम रु. 4.04 लाख इतकी होती. तर 2024 मध्ये ती रु. 7.31 लाखांवर पोहोचली. स्टँड-अप इंडिया योजना आणि मुद्रा योजनेसारख्या सरकारी उपक्रमांद्वारे प्रेरित आर्थिक आत्मविश्वास आणि व्यवसाय विस्तार दर्शवते. फ्लेक्सीलोन्सचे सह-संस्थापक रितेश जैन यांनी उत्साहाने टिप्पणी केली, “फ्लेक्सीलोन्समध्ये, आम्ही भारतातील महिला उद्योजकांच्या धडाडीचा उत्सव साजरा करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आर्थिक अडथळ्यांशिवाय महिला स्वत:चा व्यवसाय वाढवू शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी किमान कागदपत्रांसह हमी-मुक्त व्यवसाय कर्ज सहज उपलब्ध करून देणे ही आमची बांधिलकी आहे. आमच्या अनुरूप आर्थिक उपाययोजनांमुळे, आम्ही त्यांना नवीन उंची गाठण्यासाठी, त्यांच्या कामकाजाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देण्यासाठी सक्षम करत आहोत.”

डिजिटल कर्ज क्रांती

फ्लेक्सीलोन्सने आतापर्यंत रु. 9,000 कोटीहून अधिक रक्कम वितरीत केली असून ती 1,500 हून अधिक शहरे आणि गावांमध्ये कार्यरत आहे. कंपनी ई-कॉमर्स आणि पेमेंट प्लॅटफॉर्मवरील पर्यायी डेटा स्त्रोतांचा वापर करून कमीतकमी 48 तासांत, विशेषतः कमी सेवा-सुविधा असलेल्या बाजारपेठांमध्ये कर्ज मंजुरी उपलब्ध करून देते.
महिला उद्योजक तयार कपडे, एफएमसीजी वस्तू, मेडिकल स्टोअर्स, विद्युत वस्तू/फिटिंग्ज आणि सौंदर्यप्रसाधने यासारख्या क्षेत्रांत व्यवसाय करण्याकरिता व्यावसायिक कर्ज शोधत असल्याचे कंपनीच्या आकडेवारीवरून समजते. जे ग्राहकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या व्यवसायांवर जोरदार लक्ष केंद्रित करत असल्याचे दर्शवते.

भारताची आर्थिक साक्षरता जसजशी सुधारत आहे आणि औपचारिक पतपुरवठा अधिक व्यापक होत आहे, तसतशी महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईकडून व्यावसायिक कर्जाची मागणी झपाट्याने वाढेल. फ्लेक्सीलोन्स या परिवर्तनात आघाडीवर आहे. ज्यामुळे अडथळे दूर करण्यात आणि महिला उद्योजकांच्या वाढीस चालना देण्यात मदत होते.

Share Market: शेअर मार्केट घसरणीसह बंद, घसरणीतही ‘या’ कंपन्यांचे शेअर्स वधारले

Web Title: Flexiloans targets rs 100 crore loan disbursal to boost growth of women led msmes by 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 06:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.