Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचा एक निर्णय… अन् जगभरातील देशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; अनेक देशांनी केलीये मागणी!

भारताने 2023 मध्ये तांदूळ निर्यातीवर लादलेले बहुतांश निर्बंध उठवले आहेत. चांगला पाऊस झाल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. याशिवाय सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा भरपूर साठा आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 28, 2024 | 09:44 PM
भारत सरकारचा एक निर्णय... अन् जगभरातील देशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; अनेक देशांनी केलीये मागणी!

भारत सरकारचा एक निर्णय... अन् जगभरातील देशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; अनेक देशांनी केलीये मागणी!

Follow Us
Close
Follow Us:

भारताने 2023 मध्ये तांदूळ निर्यातीवर लादलेले बहुतांश निर्बंध उठवले आहेत. चांगला पाऊस झाल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. याशिवाय सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा भरपूर साठा आहे. निर्यात बंदीपूर्वी, जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ज्याद्वारे भारत 140 हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात केला जातो. दरम्यान, एकूण ५.५४ कोटी टन तांदुळ निर्यातीपैकी हे प्रमाण २.२२ कोटी टन इतके होते.

देशांच्या विनंतीनुसार निर्यात करण्यास परवानगी

भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सरकारच्या विनंतीनुसार निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने शनिवारी (ता.२८) बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. तसेच, त्यावर किमान 490 डॉलर प्रति टन किंमत निश्चित करण्यात आली होती. निर्यात शुल्कातूनही सूट देण्यात आली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी 20 जुलै 2023 पासून गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात झुरळ; कंपनीने माफी मागत कारवाईचे दिले आश्वासन!

जगातील सर्वात मोठा निर्यातदार

भारताची निर्यात जगातील पुढील चार मोठ्या निर्यातदारांच्या एकत्रित निर्यातीपेक्षा जास्त होती. यामध्ये थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारताकडून नॉन-बासमती तांदूळ खरेदी करणारे मुख्य देश बेनिन, बांगलादेश, अंगोला, कॅमेरून, जिबूती, गिनी, आयव्हरी कोस्ट, केनिया आणि नेपाळ, इराण, इराक आणि सौदी अरेबिया यांचा समावेश होतो. भारतातील बासमती तांदळावर लादलेल्या निर्बंधांमुळे 2023 मध्ये भारताची तांदूळ निर्यात 20 टक्के कमी होऊन 17.8 दशलक्ष टन झाली. 2024 च्या पहिल्या सात महिन्यांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात एक चतुर्थांश कमी होती.

मित्र राष्ट्रांना निर्यातीमुळे दिलासा

निर्यातीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत रद्द केली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत देशाने 189 दशलक्ष डॉलर किमतीचा गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) तो 852.5 दशलक्ष डॉलर इतका नोंदवला गेला होता. तांदुळ निर्यातवर बंदी असूनही, भारत सरकार मालदीव, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि आफ्रिकन देशांसारख्या मित्र राष्ट्रांना निर्यात करण्यास परवानगी देत ​​होते. या जातीचा तांदूळ भारतात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जागतिक बाजारपेठेतही याला विशेष मागणी आहे.

Web Title: India has lifted restrictions on rice exports by 2023 a decision of the government of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 09:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.