Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपने उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय

Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला सावित्री जिंदाल या अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या होत्या. भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने नाराज होत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सावित्री जिंदाल यांना 12 व्या फेरीपर्यंत 49231 मते मिळाली आहेत. दरम्यान, आता जिंदाल यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 08, 2024 | 04:21 PM
भाजपने उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय

भाजपने उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. एक्झिट पोलचे अंदाज या निवडणुकीत देखील चुकीचे ठरल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, सध्याच्या घडीला 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष 1, भारतीय लोकदल 1 आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत.

ज्या 3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. त्यामध्ये हिसार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या जागेवरुन सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून, जिंदाल यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. सावित्री जिंदाल यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता त्यांच्या या विजयाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

भाजपने उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या

सावित्री जिंदाल यांना 12 व्या फेरीपर्यंत 49231 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या राम निवास रारा यांना 30290 मते मिळाली तर, भाजपचे कमल गुप्ता यांना 17385 मते मिळाली आहे. भाजपकडून ज्या कमल गुप्ता यांच्यासाठी सावित्री जिंदाल यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. 12 व्या फेरीपर्यंत सावित्री जिंदाल 18941 मतांनी आघाडीवर आहेत.

हे देखील वाचा – चीनी धोरणापुढे ऑस्ट्रेलियन डॉलरचीही गटांगळी; गुंतवणूकदारांंचे फेडस्पीककडे लक्ष!

सावित्री जिंदाल या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. त्यांची नेटवर्थ 4280 कोटी रुपये आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या भाजपमध्ये गेल्या होत्या. मात्र, त्यांना भाजपने तिकीट न दिल्याने नाराज होत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

सावित्री जिंदाल या हरियाणामधील भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. भाजपने सावित्री जिंदाल यांच्याऐवजी कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. सावित्री जिंदाल या सध्या सावित्री जिंदाल अँड फॅमिली ग्रुपच्या प्रमुख आहेत. फोर्ब्स बिलेनियर इंडियन लिस्टमध्ये त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. जागतिक पातळीवरील यादीचा विचार केला असता, त्या 37 व्या स्थानावर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीमंत महिलांचा विचार केला असता त्या पहिल्या स्थानावर आहेत.

भाजपची हरियाणात पुन्हा सत्ता

हरियाणा राज्यातील जनतेने पुन्हा एकदा भाजपला पसंती दिल्याचे चित्र आहे. भाजप आता सलग तिसऱ्यांदा हरियाणात सत्ता स्थापन करणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज हरियाणामध्ये यावेळी देखील चुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणा राज्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असताना देखील त्यांना यश मिळवता आले नसल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये या वेळी वाढ झाली आहे.

Web Title: India richest woman savitri jindal resounding victory in haryana assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 04:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.