
'ही' कंपनी देणार फ्लाईटमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय; विमान प्रवास होणार सुखकर!
विमान प्रवास करताना अनेक जण मोबाईल न वापरता येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. अर्थात विमान प्रवास करताना काही तासांसाठी प्रवाशी व्यक्तींचा जगापासून संपर्क तुटतो. त्याला कारणही तसेच आहे. प्रामुख्याने विमानात प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्शन तुमची साथ सोडते. ज्यामुळे सर्वांचेच मोबाईल फोन फ्लाईट मोडवर गेलेले पाहायला मिळतात. मात्र, आता तुम्ही विमानात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करू शकणार आहे. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
विस्ताराच्या फ्लाईटमध्ये मिळणार मोफत इंटरनेट
टाटा उद्योग समूहाची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने आपल्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मोफत इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. अर्थात आता यापुढे विस्ताराच्या प्रत्येक फ्लाईटमध्ये प्रवाशांना २० मिनिट मोफत वायफाय सेवा मिळणार आहे. बोईंग ७८७-९ ड्रीम लायनर विमान आणि एअरबस ए३२१ निओ विमानांद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे कंपनीने घोषणेदरम्यान म्हटले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : …हीच संधी आहे, एकत्र या; पंतप्रधान मोदींचे आवाहन; ममता बॅनर्जी ताडकन उठून गेल्या!
सर्व ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळणार
टाटा सन्स आणि एसआयएच्या मालकीच्या असलेल्या विस्तारा एअरलाइन्सने म्हटले आहे की, “२० मिनिटांची मोफत वाय-फाय सुविधा प्रवाशांना सर्व शीट्स आणि सर्व विमानात कनेक्ट होण्यास मदत करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांना ईमेलद्वारे वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल आणि त्यानंतर इन-फ्लाइट वाय-फाय सेवा सुरु होईल.”
काय म्हटलंय कंपनीने?
विस्तारा या विमान वाहतूक कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी दीपक राजावत यांनी सांगितले आहे, “विस्ताराच्या सर्व केबिनमध्ये आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये मोफत वाय-फाय देणारी पहिली भारतीय विमान कंपनी असल्याचा कंपनीला आनंद आहे. ग्राहक या सुविधेची नक्कीच प्रशंसा करतील. या मोफत इंटरनेट सुविधेचा उद्देश प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुखकर बनवणे हा आहे.”