ITC Block Deal Stake Sale : सोमवारी बाजार उघडताच ITC च्या Share मध्ये होणार मोठी उलथापालथ? परदेशी कंपनीच्या निर्णयाने खळबळ

ITC Block Deal Stake Sale : भारतीय शेअर बाजारातील दिग्गज कंपनी ITC शी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून, ब्रिटिश अमेरिकन टोबॅक कंपनीने आयटीसी हॉटेल्समधील आपली उर्वरित ६.२८% संपूर्ण हिस्सेदारी ब्लॉक डीलद्वारे विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सोमवारी बाजार उघडताच मोठा धमका? ITC च्या Share मध्ये दिसणार मोठी उलथापालथ?
सोमवारी बाजार उघडताच मोठा धमका? ITC च्या Share मध्ये दिसणार मोठी उलथापालथ? ( सौजन्य - सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • सोमवारी बाजार उघडताच मोठा धमका?

  • ITC च्या Share मध्ये दिसणार मोठी उलथापालथ?

  • परदेशी कंपनीच्या मोठ्या निर्णयाने खळबळ

ITC Block Deal Stake Sale : भारतातील आघाडीची कंपनी FMCG, ITC साठी एक मोठी बातमी आहे. एका महत्त्वाच्या निर्णयामुळे बाजारात मोठी उलथापालथ दिसू शकते. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको BAT आयटीसी हॉटेल्समधून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. आपला उर्वरित हिस्सा विकण्यासाठी त्यांनी एक ब्लॉक डील सुरू केल्याचे वृत्त आहे. या बातमीचा सोमवारी कंपनीच्या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, आयटीसीचे शेअर्स ०.७५% घसरणीसह ३०५ रुपयांवर बंद झाले. नेमकी काय आहे मार्केटची परिस्थिती?

सोमवारी बाजार उघडताच मोठा धमका? ITC च्या Share मध्ये दिसणार मोठी उलथापालथ?
Pension Life Certificate : ...तर तुमची पेन्शन बंद होईल! 30 नोव्हेंबरची डेडलाईन चुकवू नका; लगेच सबमिट करा 'हे' कागदपत्र

वास्तविक पाहता, ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोची आयटीसीमध्ये मोठी हिस्सेदारी असून, आपला हिस्सा विकून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा आहे. टोबॅको मॅन्युफॅक्चरर्स (इंडिया) लिमिटेड नावाच्या कंपनीमार्फत BAT ची आयटीसी हॉटेल्समध्ये ६.२८ टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या सहा महिन्यांत आयटीसी हॉटेल्सच्या शेअरच्या किमतीत अंदाजे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्लॉक डीललाही सुरुवात

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की ब्लॉक डीलला सुरुवात झाली असून, BAT आयटीसी हॉटेल्समधून पूर्णपणे बाहेर पडण्याची योजना आखत आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी एका व्यक्तीने सांगितले की, या प्रस्तावित डीलसाठी किमान भाव (फ्लोअर प्राईस) प्रति शेअर १७५ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो शुक्रवारच्या बंद भावापेक्षा ५.२ टक्क्यांनी कमी आहे.

BTA कडे किती हिस्सा?

BTA ला आपला उर्वरित अंदाजे ६ टक्के हिस्सा विकायचा आहे. या संपूर्ण हिस्सा विक्रीचे मूल्य अंदाजे २४७ दशलक्ष डॉलर्स आहे. बी.ए.टी.कडे अजूनही आयटीसी लिमिटेडचे ​​२२ टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. त्यांनी १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला आयटीसी ग्रुपमध्ये प्रथम गुंतवणूक केली होती.

डिसेंबर २०२५ मध्ये, बॅटचे CEO तादेउ मारोक्को म्हणाले: "आयटीसी हॉटेल्समधील आमचा थेट हिस्सा हा या वर्षाच्या सुरुवातीला आयटीसीने पूर्ण केलेल्या डीमर्जर प्रक्रियेचा परिणाम होता. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, आयटीसी हॉटेल्समधील थेट हिस्सा ही बॅटसाठी धोरणात्मक गुंतवणूक नाही. त्यामुळे, मला आनंद आहे की या व्यवहारातून मिळणारा निधी २०२६ साठी निश्चित केलेल्या आमच्या 'लेव्हरेज कॉरिडॉर'च्या दिशेने होणाऱ्या आमच्या प्रगतीला आणखी बळकट करेल."

( Desclaimer : येथे शेअर बाजाराची माहिती दिली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. नवराष्ट्र गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

सोमवारी बाजार उघडताच मोठा धमका? ITC च्या Share मध्ये दिसणार मोठी उलथापालथ?
Upcoming IPO Next Week : गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! 6 कंपन्यांचे इश्यू येणार; कोणता IPO देणार बंपर रिटर्न?