रशियाचे अध्यक्ष कलादिमीर पुतिन येत्या ४-५ डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही देशांचे दीर्घकालीन संबंध आहेत. या भेटीदरम्यान सुखोई-५७ आणि एस-१०० विमानांच्या खरेदीवर चर्चा होईल.
भारतीय रुपयाने पहिल्यांदाच ₹९०/$ ओलांडले आहे. डॉलरची मागणी, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि आरबीआयचा कमी हस्तक्षेप यामुळे ही घसरण होत आहे. मंगळवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ८९.९५ वर बंद झाला होता.
यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारातून $16.5 अब्ज काढून घेतले आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याने रुपयावर अतिरिक्त दबाव येत आहे, ज्यामुळे तो आशियातील सर्वात कमकुवत चलन बनलाय