Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एलपीजी सिलेंडर, कारच्या किंमती, पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार हे 6 मोठे बदल, सर्वसामान्यांना फटका बसणार

नवीन वर्ष हे पेन्शन धारकांसाठी दिलासादायक ठरणार असून 1 जानेवारीपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटननेकडून (ईपीएफओ) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 25, 2024 | 07:57 PM
एलपीजी सिलेंडर, कारच्या किंमती, पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार हे 6 मोठे बदल, सर्वसामान्यांना फटका बसणार

एलपीजी सिलेंडर, कारच्या किंमती, पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार हे 6 मोठे बदल, सर्वसामान्यांना फटका बसणार

Follow Us
Close
Follow Us:

जुने वर्ष संपण्यासाठी आणि आता नवीन वर्ष सुरू व्हायला आता काहीच तासांचा अवधी राहिला आहे. नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नव्या आशा घेऊन येतात. त्याचप्रमाणे आपल्यासाठी काही नवीन नियमही लागू केले जातात. यंदाच्या नवीन वर्षात असेच काही नियम लागू करण्यात येणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती, पेन्शनचे नियम, कारच्या किमती अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरशिप, युपीआय 123 पे नियम आणि एफडी संबंधित नियमांचा समावेश आहे.

1. कारच्या किमतीत वाढ – नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवतील. कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.

2. एलपीजी सिलेंडरच्या किमती – दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) किमतीत बदल झालेला नाही. पण व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 73.58 डॉलर्सवर आहे. त्यामुळे भविष्यात सिलेंडरच्या किमती बदलू शकतात.

21 वर्षीय मुलाची कमाल, बनलाय भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश; वाचा… तो काय करतो?

3. पेन्शन काढण्यात बदल – नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे. 1 जानेवारी 2025 पासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही. ही सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे.

4. अ‍ॅमेझॉन प्राईम सदस्यत्वाचे नवीन नियम – अ‍ॅमेझॉन प्राईम सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत. जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, प्राईम व्हिडीओ एका प्राईम खात्यातून फक्त दोन टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राईम व्हिडीओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पूर्वी, प्राईम सदस्य एकाच खात्यातून पाच उपकरणांवरून व्हिडीओ प्रवाहित करू शकत होते.

5. मुदत ठेवीचे नियम (एफडी) – आरबीआयने एनबीएफसी आणि एचएफसीसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या बदलांतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

6. युपीआय 123 पेची नवीन व्यवहार मर्यादा – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या युपीआय 123 पे सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, या सेवेअंतर्गत कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते. परंतु आता ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

Web Title: Lpg cylinder car prices and pension epfo 6 major changes from january 1 direct impact on common man economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 07:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.