MakeMyTrip आणि Zomato ची भागीदारी, आता ट्रेन बुकिंगसोबतच करा 40,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून फूड ऑर्डर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारतातील आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेकमायट्रिपने (Make my trip) भारतातील फूड ऑर्डरिंग व डिलिव्हरी फ्लॅटफॉर्म झोमॅटोसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत ट्रेन प्रवाशांना प्रत्यक्ष त्यांच्या आसनांपर्यंत फूड डिलिव्हरची सुविधा देण्यात आली आहे. मेकमायट्रिप अॅपवर ट्रेन तिकीटे बुक करणारे प्रवासी आता १३० हून अधिक स्टेशन्सवर झोमॅटोवर सूचीबद्ध असलेल्या ४०,००० हून अधिक रेस्टॉरंट सहयोगींकडे फूड ऑर्डर करू शकतात.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९०,००० हून अधिक रेल्वे प्रवाशांनी दररोज भारतीय रेल्वेच्या ई-कॅटेरिंग सेवांचा वापर केला, ज्यामध्ये वार्षिक ६६ टक्क्यांची वाढ झाली. मेकमायट्रिप आपल्या ‘फूड ऑन ट्रेन’ ऑफरिंगच्या माध्यमातून या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहे, ज्यामध्ये ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि क्विक स्नॅक्सचा समावेश आहे. तसेच त्यांच्या प्रमुख ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ टूलचा देखील फायदा घेतला जाईल, ज्यामुळे प्लॅटफॉर्म प्रवाशांना सोयीस्कर वेळी ऑर्डर करण्यास सक्षम करते.
झोमॅटोसह या सॉफ्ट लाँचला सुरूवातीचा प्रतिसाद प्रेरणादायी राहिला आहे आणि प्रवासादरम्यान फूडचा आस्वाद घेण्याप्रती वाढती पसंती दिसून येते. या गतीला अधिक दृढ करत मेकमायट्रिप त्यांच्या ऑन-ट्रेन फूड डिलिव्हरीबाबत अधिक जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी लक्ष्यित मोहिमा सुरू करेल.
या विकासाबाबत मत व्यक्त करत मेकमायट्रिपचे मुख्य व्यवसाय अधिकारी (फ्लाइट्स, जीसीसी, कॉर्पोरेट ट्रॅव्हल) आणि मुख्य विपणन अधिकारी राज रिषी सिंग म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही ट्रेन बुकिंग क्षेत्रात एकूण उद्योगाच्या तुलनेत झपाट्याने वाढ केली आहे, ज्याचे श्रेय ग्राहक-केंद्रित नाविन्यतांवरील सातत्याच्या फोकसला जाते. आमच्या फूड ऑन ट्रेन मार्केटप्लेसच्या लाँचसह आम्ही प्रवास अनुभव अधिक उत्साहित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत आहोत, जेथे प्रवाशांना अधिक निवड व सोयीसुविधा मिळतील. झोमॅटोसोबतचा सहयोग त्या गतीला अधिक दृढ करतो आणि भारतातील गतीशीलता परिसंस्थेत झपाट्याने विकसित होणाऱ्या वापर संधी संपादित करण्यामध्ये धोरणात्मकरित्या योगदान देईल.”
या विकासाबाबत मत व्यक्त करत झोमॅटोच्या उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष राहुल गुप्ता म्हणाले, “आमची ‘सर्व्हिंग इंडिया’प्रती कटिबद्धता आम्हाला आम्ही करणाऱ्या गोष्टींसाठी प्रेरित करते आणि आमच्या ग्राहकांना विनासायास व आनंददायी अनुभव देण्यासाठी आम्ही सतत नवीन मार्गांचा शोध घेतो. मेकमायट्रिपसोबतचा हा सहयोग रेल्वे प्रवाशांना मेकमायट्रिप प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या आवडत्या रेस्टॉंरंट्समधून सोईस्करपणे फूड ऑर्डर करण्याची सुविधा देतो, जेथे थेट त्यांच्या आसनांपर्यंत फूड डिलिव्हरी करण्यात येईल. आम्हाला हा सहयोग ग्राहकांना देणाऱ्या मूल्याबाबत आनंद होत आहे.”
दिवाळी विशेष म्हणून मेकमायट्रिपवर रेल्वे प्रवासाचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना कॉम्प्लीमेण्टरी कूपन मिळेल, जे झोमॅटोच्या माध्यमातून फूड ऑर्डर्सवर रिडिम करता येऊ शकते, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक आनंददायी होईल.
मेकमायट्रिप सोयीसुविधेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान-केंद्रित वैशिष्ट्यांसह रेल्वे प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याला उत्साहित करत आहे. प्री-बुकिंग टप्प्यामध्ये प्रवाशांना रूट एक्स्टेंशन असिस्टण्स, जवळच्या स्टेशनबाबत सूचना, कनेक्टेड ट्रॅव्हल प्लॅन्स आणि नुकतेच लाँच करण्यात आलेल्या सीट अव्हेलेबिलिटी अंदाज अशा टूल्समधून फायदा मिळू शकतो. बुकिंगदरम्यान सीट लॉक, ट्रिप गॅरण्टी आणि फ्री कॅन्सलेशन यांसारखी वैशिष्ट्ये अधिक निवड व खात्री देतात. बुकिंगनंतरच्या सेवा जसे झोमॅटोच्या माध्यमातून ऑन-ट्रेन फूड डिलिव्हरी, लाइव्ह पीएनआर अपडेट्स आणि रिअल-टाइम ट्रेन ट्रॅकिंग आगमनापासून विनासायास प्रवासाची खात्री देतात.
ऑन-ट्रेन फूड डिलिव्हरीसाठी अधिकृत आयआरसीटीसी सहयोगी बनल्यापासून झोमॅटोने १३० हून अधिक स्टेशन्सवर ४.६ दशलक्षहून अधिक ऑर्डर्स सर्व्ह केल्या आहेत. ही सेवा प्रवाशांना त्यांच्या आसनांवर डिलिव्हर केल्या जाणाऱ्या पौष्टिक फूडचा आस्वाद घेण्याची सुविधा देते, ज्यामध्ये विविध पाककला व किमतींचा, तसेच पीएनआर तपशीलाचा वापर करत त्यांच्या ट्रेन प्रवासाच्या जवळपास ७ दिवस आधी फूड प्री-बुक करण्याचा पर्याय समाविष्ट आहे.