Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनबा फायनान्सचा पिज्यॉ व्‍हेईक्लस सोबत सामंजस्य करार; वाहन खरेदीदारांना फायदा मिळणार

मनबा फायनान्स लिमिटेड कंपनी आणि पिज्यॉ व्‍हेईकल्स प्रायव्‍हेट लिमिटेड (पीव्‍हीपीएल) या पिज्यॉ समुहाच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी यांच्यात सामंजस्य करार (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग अर्थात एमओयू) करण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 19, 2024 | 07:13 PM
manba-finance-signs-mou-with-peugeot-vehicles-vehicle-buyers-will-benefit

manba-finance-signs-mou-with-peugeot-vehicles-vehicle-buyers-will-benefit

Follow Us
Close
Follow Us:

बँकेतर वित्तीय सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेली मनबा फायनान्स लिमिटेड कंपनी आपल्या ग्राहकांना तीन चाकी वाहन खरेदीसाठी सुलभ व गरजेनुसार वित्त पुरवठा सेवा उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी मनबा फायनान्स लिमिटेड कंपनी आणि पिज्यॉ व्‍हेईकल्स प्रायव्‍हेट लिमिटेड (पीव्‍हीपीएल) या पिज्यॉ समुहाच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी यांच्यात सामंजस्य करार (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग अर्थात एमओयू) करण्यात आला आहे.

पिज्यॉ समुह देशात छोटे व्‍यापारी वाहन निर्मिती करण्यात आघाडीवर आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सहकार्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वित्तपुरवठा करण्यात येणार असून हाच या कराराचा मूळ हेतू आहे. ग्राहकांना वित्तपुरवठा करतांना अत्यल्प डाउन पेमेंटचा पर्याय, स्पर्धात्मक व्‍याजदर, व चार वर्षांपर्यंत कर्ज मुदत अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

पिज्यॉ व्‍हेईकल्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य व्‍यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डिएगो ग्रॅफीतसेच मनबा फायनान्स लिमिटेड कंपनीचे सीबीओ व संचालक मोनील शाह यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी मनबाचे सेल्स अँड रिटेल फायनान्सचे एक्झिक्युटीव्‍ह व्‍हाईस प्रेसिडेंट अमित सागर, तसेच पिज्यॉ व्‍हेईकल्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीच्या रिटेल् फायनान्स विभागाचे प्रमुख निलेश आर्य देखील उपस्थित होते.

हे देखील वाचा – स्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेचा शतकोत्तर वारसा!

कराराअंतर्गत मनबा फायनान्स आणि पिज्यॉ व्‍हेईकल्स कंपन्या आपल्या या भागीदारीचे कार्यान्वयन करण्यासाठी एक केंद्रीय समन्वयन पथक स्थापन करणार आहेत. हे पथक उत्पादन रचना, व्‍याजदर ठरवणे, कर्ज वितरण, केद्रीय संवाद, व प्रशिक्षण या प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे जेणे करुन या भागीदारीचे कार्यक्षमतेने कार्यान्वयन होईल व त्यावर लक्ष ठेवले जाईल.

ऑक्टोबर महिन्यात इलेक्ट्रिक तिचाकी वाहनांची तब्बल 65,700 इतकी विक्रमी विक्री झाली आहे. सणासुदीमुळे वाढलेली मागणी व शाश्वत वाहनांची निवड करण्याची वाढती वृत्ती यामुळे इलेक्ट्रीक तिचाकी वाहनांच्या विक्रीत ही विक्रमी वाढ होउ शकली आहे. गेल्या 2023 कॅलेंडर वर्षभरात एकूण 583,597 तिचाकी वाहनांची विक्री झाली होती आणि त्यात इलेक्ट्रीक तिचाकी वाहनांची संखय्या केवळ 16,856 होती.

सामंजस्य कराराअंतर्गत इंटर्नल कॉम्ब्युशन इंजिन (आयसीई) व इलेक्ट्रीक व्‍हेईकल (इव्‍ही) या दोन्ही प्रकारच्या तिचाकी वाहनांना वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे भारताच्या इलक्ट्रीक वाहनांमध्ये कायापालट करण्‍याच्या उद्दीष्टाला बळ मिळणार आहे. त्याचवेळी तिचाकी वाहन उद्योगालाही प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच सर्वसमावेश वाढवण्याच्या दृष्टीकोनातून अर्थपुरवठा करतांना महिला उद्योजकांनाही विशेष महत्व देण्यात येणार आहे. ग्राहकांना अत्यंत कार्यक्षम व सुलभ सेवेचा अनुभव मिळावा यासाठी सुरळीत चालणारी डिजिटल सेवा सुरु आहे. यातून मनबा फायनान्स कंपनी आपल्या ग्राहकांची सोय व सहज संपर्क यासाठी किती बांधील आहे हे अधोरेखित होत आहे.

सामंजस्य करार स्वाक्षरी करणयाच्या प्रसंगी मनबा फायनान्स कंपनीचे सीबीओ अँड डायरेक्टर मोनील शाह म्हणाले, “देशातील एका मोठ्या तिचाकी उत्पादक कंपनीसोबत सहकार्य करतांना आम्हाला अभिमान वाटत आहे. पिज्यॉ हा देशातील उभरत्या उद्योजकांसाठी एक विश्वासार्ह ब्रँड आहे. या भागीदारीमुळे तिचाकी उद्योग क्षेत्रात आमचे पाय मजबूतपणे रोवले जाणार आहेत. त्याचवेळी आम्हाला आपल्या ग्राहकांना सुरळीत चालणारी डिजिटल कर्जपुरवठा सेवा उपलब्ध करता येणार आहे.”

Web Title: Manba finance signs mou with peugeot vehicles vehicle buyers will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 07:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.