Market Cap: शेअर बाजारात गोंधळ! टॉप १० पैकी ८ कंपन्यांना मोठे नुकसान (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Market Cap Marathi News: शेअर बाजारातील घसरणीमुळे, गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी आठ कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण १.६५ लाख कोटी रुपयांची घट नोंदली गेली. या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता पहायला मिळाली. या काळात सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी ८ कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. तर दोनकंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं.
गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स ६२८.१५ अंकांनी किंवा ०.८२ टक्क्यांनी आणि निफ्टी १३३.३५ अंकांनी किंवा ०.५८ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली. टीसीएसचे बाजार भांडवल पुनरावलोकनाधीन आठवड्यात ५३,१८५.८९ कोटी रुपयांनी घसरून १३,६९,७१७.४८ कोटी रुपयांवर आले. भारती एअरटेलचे बाजारमूल्य ४४,४०७.७७ कोटी रुपयांनी घसरून ९,३४,२२३.७७ कोटी रुपयांवर आले.
आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप १८,२३५.४५ कोटी रुपयांनी घसरून ८,७०,५७९.६८ कोटी रुपयांवर आले.
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मूल्यांकन १७,९६२.६२ कोटी रुपयांनी घसरून ५,२६,६८४.३८ कोटी रुपयांवर आले.
इन्फोसिसचे बाजारमूल्य १७,०८६.६१ कोटी रुपयांनी घसरून ७,५३,७००.१५ कोटी रुपये झाले.
आयटीसीचे मार्केट कॅप ११,९४९.४२ कोटी रुपयांनी घसरून ५,०१,७५०.४३ कोटी रुपये झाले आणि एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप २,५५५.५३ कोटी रुपयांनी घसरून १२,९४,१५२.८२ कोटी रुपये झाले.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे मूल्यांकन ४०१.६१ कोटी रुपयांनी घसरून ६,४३,९५५.९६ कोटी रुपयांवर आले.
या ट्रेंडच्या उलट, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १४,५४७.३ कोटी रुपयांनी वाढून १६,६१,३६९.४२ कोटी रुपये झाले.
बजाज फायनान्सचे मार्केट कॅप ३८४.३३ कोटी रुपयांनी वाढून ५,२०,४६६.७५ कोटी रुपये झाले.
सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर राहिली. त्यानंतर, अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयटीसी यांचा क्रमांक लागला.