(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ज्याची भीती होती तेच घडलं… Crude Oil चा भडका,100 डॉलरच्या उंबरठ्यावर दर; आता Petrol – Diesel चे भाव…
मॅक्डोनाल्ड्स इंडियामध्ये काम करणाऱ्या एका इंटर्नचा पगार रोखला आणि त्याने तो मिळवण्यासाठी अशी शक्कल लढवली बॉसला त्याचा पगार द्यावा लागला. McDonald बाकी गोष्टींना सामोरं जावं लागलं ते वेगळं. आजची रविवारची सकाळ McDonald India साठी एका दुःखभऱ्या स्वप्नासारखी होती. लोक अंथरुणात चहा पीत असताना, McDonald मात्र त्यांच्या अडचणी सोडवण्यात व्यस्त होतं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे खाते कोणत्या मोठ्या हॅकर्सनी नाही तर कंपनीत काम करणाऱ्या एका इंटर्नने हॅक केले होते. यानंतर, त्याने एकापाठोपाठ एक अनेक पोस्ट केल्या. त्या इंटर्नने आपला बॉस अमित जोशी यांचे नावही लिहिले आणि त्यांच्यावर आरोप केले. या पोस्टनंतर, त्या इंटर्नने ज्या प्रकारे आपले विचार मांडले आहेत, त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ही पोस्ट चीनसह अनेक देशांमध्ये पोहोचली. नंतर, त्या इंटर्नने सांगितले की त्याला त्याचा पगार मिळाला आहे.

त्या अकाऊंटवरील पहिल्या पोस्टमध्ये, व्यक्तीने स्वतःची ओळख McDonald’s India तील इंटर्न म्हणून सांगतो. त्याने दावा केला की, त्याचा बॉस, अमित जोशी, याने त्याला अनेक महिन्यांपासून पगार दिला नव्हता, ज्यामुळे त्याला दोन अतिरिक्त कामे करण्यास भाग पडले. त्या पोस्टमध्ये, त्याने दावा केला की तो मॅकडोनाल्ड्स एशियाची अनेक खाती सांभाळतो, परंतु त्याला डिसेंबर २०२५ पासून पगार मिळालेला नाही.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, त्याने सांगितले की तो कस्टमर सपोर्ट आणि डिलिव्हरी अशा दोन नोकऱ्या करतो. त्याने मीमकॉइनमध्ये पैसे गमावले आणि त्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे स्पष्ट केलं.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, कथित इंटर्नने आपला पगार न मिळाल्याबद्दलची तक्रार पुन्हा एकदा सांगितली. त्याने लिहिले की तो कम्युनिटीकडून मदत घेण्याचा विचार करत आहे आणि दावा केला की कम्युनिटीकडे ₹६०,००० पेक्षा जास्त रक्कम आहे. त्याने असेही सांगितले की त्याला मे महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत.
पगारावर चर्चा केल्यानंतर आणि तिच्या बॉसचे नाव उघड केल्यानंतर, त्या इंटर्नने आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने म्हटले होते की त्याला पगार मिळाला आहे. आणखी एका पोस्ट करत त्याने स्वतःची ओळख कबीर शर्मा म्हणून दिली. या पोस्टमध्ये,त्याने $3,000 पेक्षा जास्त (अंदाजे २.८३ लाख रुपये)रक्कम मिळाली असल्याचं स्पष्ट केलं.
मात्र, अकाउंट हॅकिंगच्या या प्रकरणानंतर लगेचच, पूर्वीच्या हँडलवरून सर्व वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्यात आल्या. मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या पूर्वीच्या अकाउंटवर दिसलेल्या सर्व पोस्ट आता उपलब्ध नाहीत. पण अनेक वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन पोस्ट केले आहेत. पण या घटनेबाबत मॅकडोनाल्ड्स इंडियाने किंवा बॉस अमित जोशी यांच्यावरील आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.






