परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे की, भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा. जे लोक आधीच या हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरु असून मंत्र्यांवर सतत हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता आंदोलनकर्त्यांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना काठमांडूत रस्त्यावर पळवून पळवून मारलं आहे.
नेपाळमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 प्लॅटफॉर्म लॉक करण्यात आले आहेत. या निषेधावरून विद्यार्थी बंड करत आहेत. हिंसक निदर्शने पाहता, गुन्हेगारांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Nepal Gen Z protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यानंतर, जनरेशन झेडच्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. निदर्शक आणि पोलिसांमधील संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत आणि काहींचा मृत्यू…
Nepal social media ban : ४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान केपी ओली यांच्या सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, रेडिट आणि एक्स यासह २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली.