mukesh ambani and his family is earning more than 3300 crore rupees per year
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही अंबानी समुहाची महत्वाची कंपनी आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जवळपास 50.33 टक्के भागधारक आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा हिस्सा हा रिलायन्समधून येतो. यामुळेच अंबानी कुटुंब हे आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब मानले जाते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती ११३.५ अब्ज डॉलर इतकी आहे. अंबानी कुटुंबाने 2023-24 या आर्थिक वर्षात केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या लाभांशातून 3,322.7 कोटी रुपये कमावले आहेत.
मुकेश अंबानी नाही घेत पगार
मुकेश अंबानी हे गेल्या ४ वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणताही पगार घेत नाहीत. कोरोना काळानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. माञ, कंपनीच्या कामादरम्यान प्रवास, हॉटेल, कार, दळणवळण आणि भोजन यासह विविध खर्चासाठी त्यांना कंपनीकडून पैसे मिळतात. यात त्यांची पत्नी आणि सपोर्ट स्टाफचाही सहभाग असतो. त्याच्या बिझनेस ट्रिपचा संपूर्ण खर्च कंपनी उचलते. याशिवाय मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा संपूर्ण खर्च कंपनी देखील कंपनीकडून केला जातो.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
नीता अंबानी रिलायन्सच्या एमडी
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. याशिवाय त्या ऑगस्ट २०२३ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील होत्या. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी त्यांना कंपनीकडून 2 लाख रुपये सिटिंग फी आणि 97 लाख रुपये कमिशन म्हणून देण्यात आले होते.
मुलेही सांभाळतायेत आपली जबाबदारी
मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांची दोन्ही मुले देखील वडिलांना आपल्या व्यवसायात हातभार लावत आहे. अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आहे. मुलगी ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेलची व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहे. याशिवाय ती जिओ इन्फोकॉमच्या बोर्डावरही देखील आहे. तर धाकटा मुलगा अनंत अंबानी हे जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचे संचालक आहेत. यासाठी ते सर्वजण पगार घेतात.