Mutual Fund Data : अस्थिरतेच्या काळातही Investment कडे जोर कायम; Equity Funds मध्ये 56% वाढ

जागतिक स्तरावर असलेला भू-राजकीय तणाव आणि शेअर बाजारातील चढ-उतार असूनही भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. AMFI जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा वाढला ओघ
  • मार्चमध्ये ४०,४५० कोटींचा गाठला टप्पा
  • गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम

Mutual Fund Data : जागतिक स्तरावर असलेला भू-राजकीय तणाव आणि शेअर बाजारातील चढ-उतार असूनही भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. 'एएमएफआय'ने (AMFI) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक ५६ टक्क्यांनी वाढून ४०,४५० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम

बाजारातील अस्थिरता आणि वाढता भू-राजकीय तणाव असूनही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम राहिल्याने मार्चमध्ये इक्विटी-आधारित म्युच्युअल फंड योजनांमधील निव्वळ गुंतवणूक ५६ टक्क्यांनी वाढून ४०,४५० कोटी रुपयांवर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने फ्लेक्सी-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे झाली. ज्यांचा एकूण निव्वळ गुंतवणुकीत मोठा वाटा होता.

आकडेवारीत नेमकं काय?

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड् इन इंडिया (एएमएफआय) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे होणारी मासिक गुंतवणूक मागील महिन्यातील २९,८४५ कोटी रुपयांवरून वाढून ३२,०८७ कोटी रुपयांवर पोहोचली. या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमधील २५ हजार ९७८ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये इक्विटी योजनांमधील निव्वळ गुंतवणूक ४०,४५० कोटी रुपयांपर्यंत वाढली, फ्लेक्सी-कॅप फंडांना १०,००० कोटी रुपयांहून अधिकची सर्वाधिक निव्वळ गुंतवणूक मिळाली. यानंतर स्मॉल-कॅप फंडांमध्ये ६, २६३ कोटी रुपये आणि मिड-कॅप फंडांमध्ये ६,०६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

बहुतेक श्रेणींमध्ये सकारात्मक आवक

बहुतेक श्रेणींमध्ये सकारात्मक आवक दिसून आली, मात्र कर-बचत ईएलएसएस योजनांमधून माफक प्रमाणात निधी बाहेर गेला. दरम्यान, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफएस) मार्च महिन्यात २,२६६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी फेब्रुवारीमधील ५,२५५ कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होती. एकूणच, फेब्रुवारीमधील ९४,५३० कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये या उद्योगातून २.४ लाख कोटी रुपयांचा निव्वळ निधी बाहेर गेला. हे प्रामुख्याने डेट-ओरिएंटेड म्युच्युअल फंडांमधून २.९५ लाख कोटी रुपयांच्या मोठ्या प्रमाणात निधी बाहेर गेल्यामुळे झाले. हा निधी बाहेर गेल्यामुळे, या उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयुएम) फेब्रुवारी अखेरीस असलेल्या ८२.०३ लाख कोटी रुपयांवरून मार्च अखेरीस ७३.७३ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरली.