नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
२०२२ नंतरचा हा कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा टप्पा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा परिणाम प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल आणि एचआर विभागांवर होईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्समध्ये अंदाजे १६,००० कर्मचारी होते.
‘व्हेरायटी’नुसार, नेटफ्लिक्सचे को-सीईओ टेड सारँडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत स्पष्ट केलंय की, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीसाठी सोपा नाहीये. या स्थित्यंतराच्या काळात कंपनी कामावरून कमी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देईल.
दोन्ही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, नेटफ्लिक्सचा व्यवसाय मजबूत आहे आणि कंपनी या वर्षासाठीची आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. कंपनी अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत राहील, ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीस आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.
नेटफ्लिक्सचा व्हयुवर गट मोठा असला तरीही त्याला मोठी स्पर्धा आहे. यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या प्लॅटफॉर्मवर बराचसा कंटेंट विनामूल्य उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षक थेट या विभागांकडे ओढले जातात आणि त्यांचा बराचसा वेळ या विभागला जातो. यामुळे नेटफ्लिक्ससाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. कंपनीला आता केवळ सबस्क्रिप्शनच्या कमाईवर अवलंबून राहायचे नाही. तर त्यांची यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी आहे. कंपनी जाहिरात, लाइव्ह प्रोग्रामिंग आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी प्रयत्नदेखील सुरु आहे.
नेटफ्लिक्सने यापूर्वी २०२२ मध्ये कर्मचारी कपात केली होती. त्यावेळी घेतलेल्या निर्णयात अंदाजे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून झालेली ही सर्वात मोठी कपात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या चिंतेत वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचारी कपाताची झळ आणि इतर क्षेत्रांनाही बसते आहे का अशी चिंता प्रत्येक वर्गातील कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.
Ans: तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.
Ans: नेटफ्लिक्स समोर वेगवेगळी आव्हानं आहे. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी वापरली जात आहे.
Ans: 2022 मध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता.






