2 डिसेंबरला खुला होणार हा आयपीओ; वाचा... किती आहे किंमत पट्टा, सेबीकडे ऑफर दस्तावेज सादर!
भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एनटीपीसीची हरित ऊर्जा उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या आयपीओला (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) मान्यता दिली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओद्वारे कंपनी बाजारातून 10000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. त्यानंतर आता त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन शेअर्स असणार
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीची उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन शेअर्स असणार आहेत. म्हणजेच कंपनी पुर्णपणे नवीन शेअर जारी करेल आणि प्रवर्तक कंपनी आयपीओमधील आपला हिस्सा विकणार नाही. या आयपीओचा प्रति शेअर हा १० रुपये दर्शनी मूल्याने जारी केला जाणार आहे. बीआरएलएमशी सल्लामसलत केल्यानंतर मजल्याची किंमत, कॅप किंमत आणि जारी किंमत ठरवली जाईल.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – एलपीजीच्या किंमती, क्रेडिट कार्डचे नियम…; 1 नोव्हेंबरपासून ‘हे’ 6 मोठे बदल होणार?
10,000 कोटी रुपये उभारले जाणार
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) कडे दाखल केलेल्या मसुद्यात, एनटीपीसी ग्रीन एनर्जीने म्हटले आहे की, आयपीओमध्ये उभारण्यात येणाऱ्या 10,000 कोटी रुपयांपैकी 7500 कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी जातील. कंपनी उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि विस्तारासाठी खर्च करेल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओमध्ये काही शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. कर्मचाऱ्यांना आयपीओ किंमतीतही सूट दिली जाईल. एनटीपीसी भागधारकांसाठी देखील शेअर्स राखीव असतील. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट केले जातील.
हे देखील वाचा – “…अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल,” वाचा… महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?
अवनसे फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओलाही मंजुरी
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) ने अवनसे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या 3500 कोटी रुपयांच्या आयपीओला देखील हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीत गुंतवणूकदारांची कमाईची मोठी संधी असणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)