जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक; हातात साधे घड्याळही घालत नाही... वाचून चाट पडाल!
एनव्हीडिया ही सध्या जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. तिचे मूल्यांकन 3.65 ट्रिलियनहून अधिक आहे. या कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग हे गेल्या महिन्यातच भारतात आले होते. त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासमवेत बोलून भारतात एआयआधारित पायाभूत सुविधा विकसित करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. मात्र, आज आम्ही तुम्हांला जगातील सर्वात श्रीमंत कंपनी एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्याबाबत एक रोचक तत्थ सांगणार आहोत…
एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासाठी वेळेचे मूल्य खूप जास्त असले, तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते हातात घड्याळ घालत नाही. यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच तुम्हांला त्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
वेळेबद्दल अनोखे तत्वज्ञान
जेनसेन हुआंग यांनी अलीकडेच एका टेक इव्हेंटमध्ये सांगितले की, आपले वेळेबद्दल अनोखे तत्वज्ञान आहे. आपण घड्याळ घालत नाहीत. “मी घड्याळ घालत नाही. हे फारच कमी लोकांना माहीत आहे. त्यामागचे कारण म्हणजे सध्याची वेळ हीच सर्वात महत्त्वाची वेळ आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मी सुद्धा महत्वाकांक्षी नाही. मी त्या वेळेची वाट पाहत आहे. जेव्हा जग माझ्याकडे येईल आणि जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की एनव्हीडियाकडे दीर्घकालीन धोरण नाही. आमच्याकडे दीर्घकालीन योजना नाहीत. दीर्घकालीन नियोजनाची आपली व्याख्या ‘आज आपण काय करणार आहोत?’ हीच आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा – लाखोंची नोकरी सोडली अन् मासे विकायला सुरुवात केली; आज आहे तब्बल 4000 कोटींचा मालक!
सध्याची सर्वोत्तम वेळ आहे
सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सर्वोत्तम करिअर सल्ल्याबद्दल विचारले असता, जेन्सेन हुआंग यांनी सांगितले आहे की… “मी करिअरसाठी एकच सल्ला देईन की, सध्याची सर्वोत्तम वेळ आहे. “मी क्वचितच गोष्टींचा पाठपुरावा करतो. मी सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करतो आणि आनंद घेतो.” असेही एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग सांगितले आहे.
माळी खुप काही सांगून गेला
जेनसेन यांनी 2023 मध्ये शिकलेल्या धड्याचाही उल्लेख केला. जेन्सेन हुआंग यांनी 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यातील एक विशेष गोष्ट सांगितली की, जेव्हा ते जपानमध्ये होते. तेथील एका माळीने त्यांना अशा विचारसरणीबद्दल विचार करण्याची दृष्टी दिली. त्याने सांगितले की, माळी क्योटो (जपान) येथील एका मंदिरात खूप चांगले काम करत असे. बागेचा आकार, छोटी साधने आणि येणाऱ्या उष्णतेची भीती असतानाही तो त्याच्या कामात खूप आनंदी होता. जेनसेन म्हणाले की, जेव्हा त्याने माळीला विचारले की हे कार्य कसे पूर्ण केले, तेव्हा त्याने उत्तर दिले, “माझ्याकडे खूप वेळ आहे”.