पोलारिस स्मार्ट मीटरींग आणि थिंक गॅस यांच्यात 1 दशलक्ष स्मार्ट गॅस मीटर पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण करार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Polaris Smart Metering and THINK Gas Agreement Marathi News: पोलारिस स्मार्ट मिटरींग प्रायव्हेट लिमिटेड हा अग्रगण्य स्मार्ट मिटरींग पर्याय पुरवठादार आहे. आज या कंपनीच्या वतीने थिंक गॅससोबत 1 दशलक्ष स्मार्ट गॅस मीटर पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरीची घोषणा करण्यात आली. हा करार एकल-सर्वात मोठ्या कराराला दर्शवतो. ज्याचे मूल्य भारताच्या गॅस मीटर पुरवठ्याच्या इतिहासात रु. 500 कोटींएवढे आहे. हा करार देशाच्या स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम ऊर्जा पर्यायांत अतिशय महत्त्वाचा मापदंड ठरला.
या करारातंर्गत पोलारिस स्मार्ट मिटरींग प्रगत स्मार्ट गॅस मीटरचा पुरवठा करेल आणि व्यापक हेड-एंड सिस्टीम (एचईएस) तसेच मीटर डेटा मॅनेजमेंट सिस्टीम (एमडीएमएस) सपोर्ट उपलब्ध करून देईल. या प्रणालींमुळे थिंक गॅसचे अत्याधुनिक, एआय सक्षम गॅस वापर डेटासह सबलीकरण होईल. तसेच सुनिश्चित वेळेचा डॅशबोर्ड निर्माण होईल, गॅस वापर नमुन्याची मौल्यवान आणि निर्णायक अंतर्दृष्टी मिळेल. परिचालन क्षमता वाढवणे आणि ग्राहकांचे अनुभव वृद्धिंगत करण्यावर भर राहील.
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बोलताना थिंक गॅसचे एमडी आणि सीईओ अभिलाष गुप्ता म्हणाले, “भारत अधिक ऊर्जा कार्यक्षमतेच्या दिशेने वाटचाल करत असताना, ही भागीदारी आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक स्मार्ट, हरित आणि अधिक विश्वासार्ह ऊर्जा उपाय उपलब्ध करून देण्यात मदत करेल. एआय-संचालित विश्लेषण आणि डॅशबोर्डचे एकत्रीकरण हे आम्ही आमच्या समुदायांची सेवा करण्याच्या पद्धतीमध्ये एक गेम-चेंजर आहे. पोलारिस स्मार्ट मिटरींगचे कौशल्य हे सुनिश्चित करते की आपण आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुसज्ज आहोत.”
पोलारिस स्मार्ट मिटरींगचे सीईओ यशराज खेतान म्हणालेः “हा करार ऊर्जा मिटरींग क्षेत्रातील नाविन्य आणि उत्कृष्टतेप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. थिंक गॅसबरोबरची आमची भागीदारी कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि संपूर्ण भारतात ऊर्जा उपलब्धता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या आमच्या एकसमान दृष्टीकोनाला अधोरेखित करते. देशातील स्मार्ट गॅस मिटरींग पायाभूत सुविधा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या ऊर्जा परिवर्तनातील विश्वासार्ह भागीदार म्हणून पोलारिस स्मार्ट मिटरींगचे स्थान बळकट झाले आहे. या स्मार्ट मीटरच्या वापरामुळे भारतातील वायू वितरण क्षेत्रात क्रांती घडेल. ज्यामुळे अचूक, स्वयंचलित वाचन शक्य होईल आणि लाखो घरे आणि व्यवसायांसाठी अखंड ऊर्जा व्यवस्थापन सुनिश्चित होईल. प्रगत एआय तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण कार्ये अनुकूल करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा भविष्याकडे संक्रमणास समर्थन देण्यासाठी कृतीयोग्य अंतर्दृष्टी मिळवून देईल.
पोलारिस स्मार्ट मिटरींग प्रायव्हेट लिमिटेड ही एक अग्रगण्य भारतीय स्मार्ट मीटर उत्पादक आणि प्रगत मिटरींग पायाभूत सुविधा उपाय पुरवठादार आहे. जी भारतातील ऊर्जा पुरवठादारांना सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण स्मार्ट मिटरींग उपाय आणि विश्लेषण मिळवून देते. नावीन्यपूर्ण बांधिलकीसह, पोलारिस स्मार्ट मिटरींग अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. जे कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि ग्राहकांचे समाधान वाढवते.
शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो ग्राहकांना सेवा पुरविणारी थिंक गॅस ही भारताच्या वायू वितरण क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. ऊर्जा कार्यक्षमता आणि ग्राहक-केंद्री उपाययोजनांसाठी वचनबद्ध असलेले हे नाव भारताच्या ऊर्जा परिवर्तनात अग्रेसर आहेत.