पुण्यात घरांच्या विक्रीला ब्रेक (फोटो- ai gemini)
प्रॉपटायगरच्या ‘रिअल इनसाइट’ अहवालातून ही माहिती समोर आली आहे. देशातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी मालमत्ता बाजाराचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. या आठ शहरांमध्ये एप्रिल-जून २०२६ मध्ये एकूण ९१,७२९ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ९७,६७४ घरांच्या तुलनेत विक्री सहा टक्क्यांनी घटली आहे.
पुण्यात एप्रिल-जून २०२५ मध्ये १५,९६२ घरांची विक्री झाली होती. यंदाच्या तिमाहीत हा आकडा १२,६४२ वर आला. म्हणजेच वर्षभरात पुण्यातील घरविक्रीत ३,३२० घरांची घट झाली असून, प्रमाण २१ टक्के आहे. आठ प्रमुख शहरांमध्ये अहमदाबादनंतर पुण्यातील विक्रीतील घट मोठी आहे. जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती, पश्चिम आशियातील संघर्ष तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या परिस्थितीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबतची चिंता यामुळे संभाव्य घरखरेदीदार सावध झाले आहेत. त्याचा परिणाम घरांच्या मागणीवर आणि विक्रीवर होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यातील घसरणीच्या तुलनेत काही शहरांमध्ये घरबाजाराची स्थिती सकारात्मक राहिली. चेन्नईमध्ये घरांची विक्री ३६ टक्क्यांनी, तर हैदराबादमध्ये १५ टक्क्यांनी वाढली. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशात सात टक्के, दिल्ली-एनसीआरमध्ये सात टक्के, बंगळुरूमध्ये नऊ टक्के आणि कोलकात्यात नऊ टक्के घट झाली.
पुण्यातील घरविक्री
– एप्रिल-जून २०२५ : १५,९६२ घरे
– एप्रिल-जून २०२६ : १२,६४२ घरे
– घट : ३,३२० घरे
– विक्रीतील घट : २१ टक्के
– आठ शहरांतील एकूण विक्री : ९१,७२९ घरे
– आठ शहरांतील एकूण घट : ६ टक्के
LPG Connection New Rule: कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट
घरविक्रीची स्थिती
शहर एप्रिल-जून २०२५. एप्रिल-जून २०२६. बदल
दिल्ली – (एमएमआर) २५,९३९. २४,११२. ७%
एनसीआर. १०,०५१. ९,३५२. ७%
बंगळुरू. १५,६२८. १४,१८६. ९%
पुणे. १५,९६२. १२,६४२. २१%
अहमदाबाद. ९,४५१. ७,५४१. २०%
कोलकाता. ३,८४७. ३,५१७. ९%
चेन्नई. ५,२८३. ७,१८३. ३६%
हैदराबाद. ११,५१३. १३,१९६. १५%
एकूण: ९१,७२९ घरांची विक्री; मागील वर्षाच्या तुलनेत ६% घट.
दुसऱ्या तिमाहीतील विक्रीच्या आकडेवारीवरून देशातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत कमकुवतपणा नसून, बाजारपेठ अधिक स्थिर आणि परिपक्व होत असल्याचे दिसून येते.
– प्रकाश तेजवानी,
प्रॉपटायगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी






