बाजारातील तेजीचा SBI आणि HDFC बँकेला मोठा फायदा, टॉप १० कंपन्यांपैकी 'या' कंपन्यांचे मूल्य ६०,६७७ कोटींनी वाढले (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Market Cap Marathi News: बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत, या आठवड्यातील व्यवहारात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार मूल्य ६०,६७७ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्याच वेळी, ५ कंपन्यांचे मूल्य ३९,६१० कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
या कालावधीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयचे मूल्य २०,४४६ कोटी रुपयांनी वाढून ७.६३ लाख कोटी रुपये झाले आणि एचडीएफसीचे मूल्य १४,०८४ कोटी रुपयांवरून १५.२८ लाख कोटी रुपये झाले. एलआयसीचे मूल्य १५,३०७ कोटींनी घसरून ५.६२ लाख कोटींवर आले.
दरम्यान, यावेळी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) च्या शेअर्सची विक्री झाली आणि त्याचे मूल्य ₹१५,३०७ कोटींनी कमी होऊन ₹५.६२ लाख कोटींवर आले आहे. या कालावधीत, बजाज फायनान्सचे मूल्य ₹९,६०१ कोटींनी कमी होऊन ₹५.३६ लाख कोटींवर आले आहे.
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी शेअर बाजार तेजीत होता. सेन्सेक्स ५८ अंकांच्या वाढीसह ८०,५९८ वर बंद झाला. निफ्टी १२ अंकांनी वाढून २४,६३१ वर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३० पैकी १३ शेअर्स वधारले तर १७ शेअर्स खाली आले. झोमॅटो, इन्फोसिस आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वधारले. टाटा स्टील, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि बीईएलचे शेअर्स घसरले.
निफ्टीच्या ५० समभागांपैकी २१ समभाग वधारले आणि २९ समभाग घसरले. एनएसईचे धातू, रिअल्टी आणि तेल आणि वायू निर्देशांक घसरले. तर आयटी, फार्मा, बँकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे निर्देशांक वधारले.
एसबीआयचे मार्केट कॅप ₹२०,४४५.८२ कोटींनी वाढून ₹७,६३,०९५.१६ कोटी झाले.
एचडीएफसी बँकेचे मूल्य ₹१४,०८३.५१ कोटींनी वाढून ₹१५,२८,३८७.०९ कोटी झाले.
इन्फोसिसने ₹९,८८७.१७ कोटींची वाढ करून ₹६,०१,३१०.१९ कोटींवर पोहोचला.
भारती एअरटेलचे मार्केट कॅप ₹८,४१०.६ कोटींनी वाढून ₹१०,६८,२६०.९२ कोटी झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य ₹७,८४८.८४ कोटींनी वाढून ₹१८,५९,०२३.४३ कोटी झाले.
एलआयसीचे बाजार भांडवल ₹१५,३०६.५ कोटींनी घसरून ₹५,६१,८८१.१७ कोटी झाले.
बजाज फायनान्सचा नफा ₹९,६०१.०८ कोटींनी घसरून ₹५,३५,५४७.४४ कोटी झाला.
आयसीआयसीआय बँकेचे नफा ₹६,५१३.३४ कोटींनी घसरून ₹१०,१८,९८२.३५ कोटी झाले.
टीसीएस मार्केट कॅप ₹४,५५८.७९ कोटींनी घसरून ₹१०,९३,३४९.८७ कोटी झाला.
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मूल्य ₹३,६३०.१२ कोटींनी घसरून ₹५,८३,३९१.७६ कोटी झाले.
बाजार मूल्याच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजने यादीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.