Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Holiday: धुळवडच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार? जाणून घ्या सर्वकाही…

Share Market Holiday: शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी, होळी आणि ईद उल फित्र या सणांमुळे मार्च मध्ये तब्बल १२ दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. मार्च मधील शनिवार आणि रविवार च्या साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार २, ३

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 13, 2025 | 03:27 PM
Share Market Holiday: धुळवडच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार? जाणून घ्या सर्वकाही… (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Share Market Holiday: धुळवडच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार? जाणून घ्या सर्वकाही… (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Share Market Holiday Marathi News: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स शुक्रवारी (१४ मार्च) होळीनिमित्त बंद राहतील. बीएसई आणि एनएसईमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. याशिवाय, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB), करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. होळीच्या सुट्टीमुळे, शुक्रवारी बीएसई आणि एनएसईमध्ये व्यवहार पूर्णपणे बंद राहतील आणि १७ मार्च २०२५ (सोमवार) पासून बाजार सामान्य वेळेनुसार पुन्हा सुरू होईल.

एनएसईने जाहीर केलेल्या २०२५ च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या संपूर्ण वर्षात शेअर बाजार एकूण १४ सुट्ट्यांसाठी बंद राहतील. होळीनिमित्त १४ मार्च रोजी शेअर बाजार बंद राहण्याव्यतिरिक्त, ३१ मार्च (सोमवार) रोजी ईद-उल-फित्रनिमित्त बीएसई आणि एनएसईमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Bank Holiday: बँकेची कामे आताच उरकून घ्या, सलग तीन दिवस बँका राहणार बंद

मार्च मधील सुट्ट्या

मार्च २०२५ मध्ये एकूण १२ दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी, होळी आणि ईद उल फित्र या सणांमुळे मार्च मध्ये तब्बल १२ दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. मार्च मधील शनिवार आणि रविवार च्या साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार २, ३, ८, ९, १५, १६, २२, २३, २९ आणि ३० तारखेला बंद असेल. होळीनिमित्त 14 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहील, तर 31 मार्च 2025 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणानिमित्त सुट्टी असेल. होळी शुक्रवार, 14 मार्च रोजी आहे. यानंतर शनिवार 15 मार्च आणि रविवार 16 मार्च या तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग तीन दिवस बाजारात व्यवहार होणार नाहीत. तसेच 29 ते 31 मार्चपर्यंत शेअर बाजार बंद राहणार आहे. 29 मार्चला शनिवार आणि 30 मार्चला रविवार आहे आणि 31 मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे.

वर्षभरातील सुट्ट्यांची यादी

२६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) महाशिवरात्री

१४ मार्च २०२५ (शुक्रवार) होळी

३१ मार्च २०२५ (सोमवार) ईद-उल-फित्र (रमजान ईद)

१० एप्रिल २०२५ (गुरुवार) श्री महावीर जयंती

१४ एप्रिल २०२५ (सोमवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१८ एप्रिल २०२५ (शुक्रवार) गुड फ्रायडे

१ मे २०२५ (गुरुवार) महाराष्ट्र दिन

१५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) स्वातंत्र्यदिन

२७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) गणेश चतुर्थी

२ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) महात्मा गांधी जयंती, दसरा

२१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) दिवाळी, लक्ष्मीपूजन

२२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) दिवाळी, बलिप्रतिपदा

५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरुपौर्णिमेनिमित्त

२५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) नाताळ

शेअर बाजाराची वेळ

भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराचे तास सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत आहेत. नियमित कामकाजाच्या दिवशी प्री-ओपन सत्र सकाळी ९:०० ते ९:१५ पर्यंत चालते. शनिवार आणि रविवारी बाजार बंद असतो.

मोठ्या घसरणीनंतर 30 टक्के वाढू शकतो ‘हा’ बँकिंग स्टॉक, CLSA ने २ कारणांमुळे दिला ‘Buy’ करण्याचा सल्ला

Web Title: Share market holiday will the stock market be closed on dhulwad know everything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 03:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.