17 वेळा ठरला अपयशी, तरीही नाही मानली हार; आकाश, ईशा अंबानी यांना पिछाडी देत बनलाय सर्वात मोठा करोडपती!
अंकुश सचदेवा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटचे सीईओ आणि संस्थापक आहेत. हुरुन इंडियाच्या 2024 वर्षाखालील 35 वर्षांच्या यादीत ते अव्वल ठरले आहे. हुरुन इंडियाने 35 वर्षांपर्यंतच्या भारतीय उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात आपापल्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्यांची वर्णी लागली आहे. या यादीत अंकुश सचदेवा पहिल्या क्रमांकावर आहे. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अंकुशला मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, पण त्याला नोकरीत रस नव्हता. त्यामुळे त्याने व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
अंकुशने व्यवसाय सुरू करण्यासाठी, तब्बल 17 वेळा प्रयत्न केले. त्याने 17 स्टार्टअप्समध्ये आपला हात आजमावला. परंतु त्यात त्याला अपयशी आले. वारंवार पराभूत होऊनही अंकुशने धीर सोडला नाही. याच धीरापोटी त्याला 18 व्या प्रयत्नात यश मिळाले. त्याचे दोन मित्र भानू प्रताप सिंग आणि उरीद अहसान यांच्यासोबत त्याने शेअर चॅटची सुरूवात केली. यावेळी ही कल्पना हिट झाली आणि काही वेळातच त्यांची कंपनी अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये पसरली.
सध्याच्या घडीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटचे करोडो वापरकर्ते आहेत. गुगल प्ले स्टोअरवर त्याचे 500 दशलक्षहून अधिक डाउनलोड झाले आहेत. त्याने मोज नावाचा एक छोटा व्हिडिओ प्लॅटफॉर्म देखील तयार केला आहे, जो टिकटॉकला भारतात पर्यायी मानला जातो. हुरुन इंडियाच्या यादीपूर्वी, 2018 मध्ये, अंकुश सचदेवाने फोर्ब्स 30 अंडर 30 एशियाच्या यादीत स्थान मिळवले होते. आज त्यांची कंपनी 50,0000 कोटी रुपयांची आहे. विशेष म्हणजे हुरुन इंडिया अंडर 35 च्या यादीमध्ये अंकुश सचदेवने मुकेश अंबानी यांची मुले ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांना पिछाडी देत, प्रथम क्रमांक मिळवला आहे.
हे देखील वाचा – घरांच्या विक्रीत मोठी घसरण, वाढत्या किंमतींमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला लागलाय ब्रेक!
दरम्यान, हुरुन इंडियाच्या यादीत भारतातील 150 उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अशा उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या व्यवसायाचे किमान मूल्य 5 कोटी डॉलर इतके आहे. या यादीत मराठीचे संस्थापक गझल अलग, फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे यांचीही नावे आहेत.