डेटा सेंटर्ससाठी प्रगत कूलिंग सोल्यूशन्स सादर करण्यासाठी श्री रेफ्रिजरेशन्सची स्मर्ड्टशी हातमिळवणी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड जे संरक्षण क्षेत्राला कूलिंग सोल्यूशन्स पुरवणारे अग्रगण्य उद्यम आहे, यांनी डेटा सेंटर कूलिंग सोल्यूशन्ससाठी ऑइल-फ्री चिलर्समधील जागतिक अग्रणी कंपनी स्मार्ड्ट चिलर्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीतून एसआरएल अत्याधुनिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर टेक्नॉलॉजी, जी विशेषतः मिशन-क्रिटिकल डेटा सेंटर अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेली आहे, भारतात आणणार आहे. हा सामंजस्य करार एसआरएलच्या पूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनी ट्रेजर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड मार्फत करण्यात आला.
जागतिक आघाडीच्या कंपनीसोबतची ही भागीदारी एसआरएलच्या वाढीच्या दीर्घकालीन धोरणाशी पूर्णतः सुसंगत आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल बोलताना श्री. आर. जी. शेंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड, म्हणाले: “डेटा सेंटर्ससाठी उच्चतम कार्यक्षमता आणि अखंडित सेवा अत्यंत महत्त्वाची असते. स्मार्ड्टसोबतच्या भागीदारीतून आम्ही भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर तंत्रज्ञान देऊ शकतो, ज्यामुळे आमची मिशन-क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला कार्यक्षम आणि विश्वसनीय कूलिंग सोल्यूशन्स पुरवण्याची वचनबद्धता अधिक मजबूत होईल. संरक्षण क्षेत्रात, विशेषतः युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये आम्ही आधीच अग्रणी असल्यामुळे, डेटा सेंटर क्षेत्रातही आम्ही ग्राहकांना प्रचंड मूल्य देऊ याची आम्हाला खात्री आहे. हा टप्पा एसआरएलच्या वाढीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे संरक्षण आणि औद्योगिक कूलिंग क्षेत्रातील आमच्या नेतृत्वाबरोबरच आता झपाट्याने वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्रात आमची उपस्थिती निर्माण होणार आहे.”
या पोर्टफोलिओ विस्तारामुळे एसआरएलला आपल्या पारंपरिक संरक्षण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक कूलिंग क्षेत्रात नव्या संधी निर्माण करता येतील. पुढील तीन वर्षांत या नवीन विभागातून कंपनीला १०–१५% महसूल मिळेल, ज्यामुळे व्यवसायाचे मिश्रण अधिक संतुलित होईल आणि वाढ व नफा क्षमता खुली होईल.
स्मार्ड्ट चिलर ही ऑइल-फ्री चिलर्समधील जागतिक अग्रणी कंपनी असून जगभरात १०,००० पेक्षा जास्त इंस्टॉलेशन्स केलेले आहेत. ऑइलऐवजी मॅग्नेटिक बेअरिंग्जवर चालणारे हे चिलर्स वीजेची मोठ्या प्रमाणावर बचत करतात आणि देखभाल खर्चही कमी करतात. त्यामुळे हे चिलर्स पारंपरिक ऑइल-ल्यूब्रिकेटेड चिलर्सपेक्षा २०–५०% अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरतात आणि उद्योगातील सर्वात कमी पॉवर युटिलायझेशन इफिशन्सी (PUE) साध्य करतात – जे आजच्या कोणत्याही डेटा सेंटरसाठी अत्यंत आवश्यक आहे.
या बाजारपेठेतील प्रचंड संधीबद्दल बोलताना श्री. डेरेक चॅन, डायरेक्टर डेटा सेंटर्स (आशिया पॅसिफिक), स्मार्ड्ट चिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, म्हणाले: “भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा डेटा सेंटर बाजार आहे आणि या बाजारात आमची वर्ल्ड-क्लास मॅग्नेटिक बेअरिंग चिलर तंत्रज्ञान आणण्यासाठी श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. एसआरएलची मजबूत उद्योगातील उपस्थिती आणि तांत्रिक कौशल्य यांच्या जोरावर आम्ही ग्राहकांना ऊर्जा कार्यक्षम आणि भविष्याभिमुख कूलिंग सोल्यूशन्समध्ये अतुलनीय मूल्य देऊ असा आम्हाला विश्वास आहे.”
एसआरएलने आधीच भारतात ४०+ मॅग्नेटिक बेअरिंग चिलर्स तयार, बसवून व कार्यान्वित केले आहेत, ज्यातून त्यांची प्रगत तंत्रज्ञानातील तज्ज्ञता दिसून येते. भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या डेटा सेंटर कूलिंग बाजारात प्रवेश करून एसआरएलने अधिक गंभीर व महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. स्मार्ड्टच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासोबत एसआरएलचे अभियांत्रिकी व सेवा वितरणातील अनुभव मिळून, कंपनी भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढील पिढीच्या कूलिंग सोल्यूशन्सची मानके निर्माण करण्याच्या दिशेने सक्षमपणे पुढे जात आहे. तसेच, आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत, भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत ऊर्जा कार्यक्षम आणि शाश्वत विकासाच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहणार आहे.