Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातील चमक परतली; सेन्सेक्स 820 तर निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह बंद!

जागतिक बाजारावरील मंदीचे सावट काहीसे कमी झाल्याने, त्याचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजार तेजीत पाहायला मिळत आहे. आजही (ता.९) बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा ( बीएसई) सेन्सेक्स 820 अंकांच्या वाढीसह 79,706 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 24,367 अंकांवर बंद झाला.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 09, 2024 | 04:10 PM
'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. आजही (ता.९) जागतिक बाजारातील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आज शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त उसळीसह बंद झाला आहे. बाजारातील ही वाढ प्रामुख्याने आयटी, ऊर्जा आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे दिसून आली आहे.

सेन्सेक्समध्ये 820 तर निफ्टीमध्ये 250 अंकांची वाढ

दरम्यान, अमेरिकेतील मंदीचा धोका टळताना दिसत आहे, त्यामुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा ( बीएसई) सेन्सेक्स 820 अंकांच्या वाढीसह 79,706 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 24,367 अंकांवर बंद झाला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : ओला इलेक्ट्रिक शेअर्समध्ये तुफान तेजी; 18 टक्क्यांनी वाढला भाव, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण!

या शेअर्समध्ये तुफान तेजी

आज शेअर बाजार सुरु असताना, आजच्या व्यवहारादरम्यान, टाटाचा ट्रेंट शेअर्स 11.18 टक्के किंवा 631 रुपयांच्या वाढीसह 6275 रुपयांच्या आजीवन उच्चांकावर बंद झाला. याशिवाय आयशर मोटर्स ५.५४ टक्के, ओरॅकल फिन सर्व्हिसेस ५ टक्के, इन्फोएज ४.३७ टक्के, एमसीएक्स इंडिया ३.९२ टक्के, सन टीव्ही नेटवर्क ३.६८ टक्के, कॅनरा बँक ३.२७ टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय लुपिन, ओएनजीसी, श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock market boom sensex 820 while nifty closed with an increase of 250 points

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • share market news

संबंधित बातम्या

Bank Holiday: ३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे? वाचा संपूर्ण यादी
1

Bank Holiday: ३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे? वाचा संपूर्ण यादी

सर्वसामान्यांना दिलासा! महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, ‘या’ वस्तू झाल्या स्वस्त
2

सर्वसामान्यांना दिलासा! महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, ‘या’ वस्तू झाल्या स्वस्त

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ फार्मा कंपनीने १:१० स्टॉक स्प्लिट आणि १:१ बोनसची केली मोठी घोषणा
3

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ फार्मा कंपनीने १:१० स्टॉक स्प्लिट आणि १:१ बोनसची केली मोठी घोषणा

जुलैमध्ये NFO मधील गुंतवणूक पहिल्यांदाच 30,000 कोटींच्या पुढे, ‘या’ मोठ्या एनएफओनी बजावली महत्त्वाची भूमिका
4

जुलैमध्ये NFO मधील गुंतवणूक पहिल्यांदाच 30,000 कोटींच्या पुढे, ‘या’ मोठ्या एनएफओनी बजावली महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.